मुंबई : भारतातील ट्रॅक्टर उद्योगाने जुलै महिन्यात ५९,५८६ इतकी विक्री नोंदवली. मागील वर्षांत याच महिन्याच्या तुलनेत विक्रीचा आकडा घसरला असला तरी पीक उत्पादनात आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या पाच राज्यांत ट्रॅक्टर खरेदीत जवळपास निम्मा म्हणजे ४६ टक्के वाटा राहिल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतीसाठी यंत्र-उपकरणे आणि ट्रॅक्टरसाठी डिजिटल बाजारमंच असलेल्या ट्रॅक्टर जंक्शनह्णने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमधील ट्रॅक्टर विक्री ही वार्षिक आधारावर २८ टक्क्यांनी घटली आहे. यामागे मुख्यत्वेकरून मागील वर्षांतील दमदार खरेदीची आकडेवारी आणि यंदाच्या हंगामात मोसमी पावसाचा असमान प्रसार हे कारण असल्याचे तिने सांगितले आहे. सरलेल्या जुलैमध्ये देशात अनेक भागांत पूरस्थिती, पेरण्या वाया जाणे आणि मुसळधार पावसामुळे  सामान्य जनजीवन अनेक दिवस विस्कळीत झाल्याचेही दिसले आहे. ट्रॅक्टर जंक्शनचे संस्थापक रजत गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, याच कारणाने मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रमुख शेतीप्रधान राज्यांमधील विक्रीची नेमक्या आकडेवारीचा यात समावेश होऊ शकलेला नाही. तथापि, परंपरागतरीत्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगले पीक उत्पन्न मिळते आणि ट्रॅक्टर व इतर शेती उपकरणांच्या उलाढालीच्या दृष्टीने हा चांगला काळ असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिल ते जून २०२२ या तिमाहीत, भारतात एकूण १,६०,०२१ ट्रॅक्टरची विक्री झाली असून, वार्षिक तुलनेत त्यात जवळपास १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलैमध्ये मिहद्र अँड मिहद्रच्या ट्रॅक्टरनी सर्वाधिक विक्री नोंदवली, त्यानंतर स्वराज ट्रॅक्टर, सोनालिका ट्रॅक्टर, मॅसी फग्र्युसन आणि एस्कॉर्ट्स यांचा क्रमांक लागतो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tractor industry sales down to 59586 units in july 2022 zws
First published on: 11-08-2022 at 01:51 IST