upi transaction crosses rs 11 lakh crore in september zws 70 | Loksatta

‘यूपीआय’ व्यवहारांची कोटीच्या कोटी उड्डाणे ; सप्टेंबरमध्ये उलाढालीत ११ लाख कोटींचा विक्रमी टप्पा

चालू वर्षांत मे महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराने १० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

‘यूपीआय’ व्यवहारांची कोटीच्या कोटी उड्डाणे ; सप्टेंबरमध्ये उलाढालीत ११ लाख कोटींचा विक्रमी टप्पा
ऑनलाइन पेमेंट पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झालेत, आता काळजी करू नका(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली,: नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ११ लाख कोटी रुपये मूल्याचे तब्बल ६७८ कोटींहून अधिक व्यवहार पार पडले, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने मंगळवारी दिली.

चालू वर्षांत मे महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराने १० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात ६५७.९ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून १०.७२ लाख कोटी मूल्याचे व्यवहार पार पडले. तर सरलेल्या महिन्यात प्रथमच ११ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला गेला. सध्या यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. रोकडरहित अर्थात कॅशलेस अर्थव्यवस्था बनण्यामागे यूपीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारांचे मूल्य मे महिन्याच्या १०,४१,५०६ कोटी रुपयांवरून, १०,१४,३८४ कोटी रुपयांपर्यंत कमी झाले होते. जुलैमध्ये पुन्हा त्यात वाढ होऊन ते १०,६२,७४७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर पोहोचले. आता सणोत्सवाचा हंगाम असल्याने चालू ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबरमध्ये व्यवहारांचे नवीन विक्रम प्रस्थापित होणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बँकांकडून व्याजदर वाढीचे सत्र ; सामान्यांच्या खिशाला भार 

संबंधित बातम्या

Gold-Silver Price on 22 November 2022: सलग दोन दिवस सोने-चांदीच्या किमतीमध्ये घट; पाहा आजचे नवे दर
Gold-Silver Price on 21 July 2022: जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजचा सोने-चांदीचा भाव
Gold-Silver Price on 12 November 2022: एक तोळे सोन्याची किंमत आकाशाला भिडली; पाहा सोने-चांदीचे नवे दर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs NZ: मायकल वॉनने धवन-लक्ष्मणच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘टीम इंडिया जुन्या….!’
BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीत शोककळा
पुण्यात बालिकेवरील अत्याचाराचा प्रकार नऊ वर्षांनंतर झाला उघड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
“ज्या माणसाने दारू पिऊन…” जितेंद्र आव्हाडांची गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका!
युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब