अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने बुधवारी आपल्या धोरण व्याजदरात अर्धा टक्का वाढ केली. देशातील महागाईच्या प्रचंड दबावाला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्चमध्ये किरकोळ चलनवाढ ५.२ टक्क्यांवर पोहोचली होती. तर फेडरल रिझर्व्हला ती २ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. मार्चच्या सुरुवातीला, खुल्या बाजारावरील फेडरल रिझर्व्हच्या समितीने धोरणात्मक व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवला. यूएस फेडरल रिझर्व्हने ४ मे रोजी बेंचमार्क व्याजदरात ५० बेस पॉईंट्सने वाढ केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फेडरल रिझर्व्ह समितीच्या दोन दिवसीय बैठकीनंतर बुधवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात धोरण दर ०.७५ टक्क्यांवरून एक टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. फेडरल रिझर्व्हने २००६ नंतर प्रथमच सलग दुसऱ्या महिन्यात पॉलिसी व्याजदरात वाढ केली आहे. तसेच २००० नंतर प्रथमच पॉलिसी व्याजदरात एकाच वेळी अर्धा टक्के वाढ केली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us federal reserve also increased the policy interest rate by 50 basis points abn
First published on: 05-05-2022 at 07:54 IST