मुंबई : निरंतर बदलत्या वातावरणात तग धरून, प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठण्याची धमक असणारे उद्योगधंदेच टिकाव धरतील, हा करोना साथीच्या दोन लाटांनी दिलेला धडा आहे. करोनाकाळाचा सर्वाधिक फटका बसला असताना वस्त्रोद्योग क्षेत्रात, नव्याने सुरुवात करूनही २० पटीने विक्रीत वाढ साधण्याची किमया ‘वीअर्डो’ या ऑनलाइन फॅशन नाममुद्रेने दाखविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली जेव्हा सुरुवात केली, तेव्हा साथीचे संकट येईल आणि ‘ऑनलाइन’ हाच विक्रीचा मार्ग खुला राहिलेला असेल, याची कल्पनाही केली नव्हती, असे वीअडरेचे सह-संस्थापक धवल अहिर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यांच्यासह अमरदीप जाडेजा आणि पीयूष गणात्रा यांनी वय वर्षे १६ ते ४५ वयोगटातील पुरुषांना साजेसे आणि किफायतशीर फॅशन परिधानांच्या निर्मिती व ऑनलाइन विक्रीच्या या नवउद्यमी उपक्रमाची पायाभरणी केली. स्मार्टफोनच्या शहरी, निमशहरी ते ग्रामीण भागांपर्यंत वाढत्या प्रसारासह, तयार वस्त्रप्रावरणांच्या ई-व्यापारानेही वेगवान प्रगती साधली असून, गत दोन वर्षांतील साथ-र्निबधांमुळे या प्रवाहाला मोठीच चालना दिली आहे.

पुरुषांसाठी परिधानांपासून सुरुवात करणाऱ्या वीअडरेने जबरदस्त सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे, एप्रिल २०१९ मध्ये जूनबेरी या नावाने महिला परिधानांची श्रेणी तयार केली. अल्पावधीतच या श्रेणीलाही उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. करोनाकाळातील विक्रीतील दमदार वाढीच्या पाश्र्वभूमीवर लवकरच लहानग्यांच्या फॅशन परिधानांच्या श्रेणीत प्रवेशाचे नियोजन असल्याचे अहिर यांनी सांगितले. ३०० हून अधिक रचना आणि १,५०० प्रकारची उत्पादने अशी पाच वर्षांतील प्रगती २० पटीने वाढ दर्शविणारी असल्याचे ते म्हणाले.

आगामी दोन वर्षांत, २०२३ पर्यंत ग्राहकसंख्येत दुपटीने वाढ आणि १५० कोटी रुपयांची उलाढालीचे लक्ष्य गाठले जाईल आणि सुमारे ७०० ते ८०० नवीन रोजगारसंधी यातून निर्माण होतील, असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veirdo target of rs 150 crore turnover in apparel sector zws
First published on: 21-07-2021 at 02:56 IST