वसंत माधव कुळकर्णी

सरलेल्या शुक्रवारी ‘सेबी’ने परिपत्रकाद्वारे लादलेले निर्बंध गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन हिताचे आहेत. बँक ठेवींवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक परतावा मिळविण्यासाठी ज्या गुंतवणूकदारांनी भारतीय समभागात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवला आहे अशा गुंतवणूकदारांना यातून निश्चितच हायसे वाटावे.

मागील महिन्याभरातील बाजारातील घसरण गुंतवणूकदारांसाठी तर्कहीन असली तरी ती अवाजवी आहे असे मानता येणार नाही. भारतीय शेअरचे मूल्यांकन आणि हे मूल्यांकन ज्या गोष्टींवर अवलंबून असते अशा मूलभूत बाबी लक्षात घेता तरी तसे वाटते. मागील महिन्याभरात बाजारात तब्बल ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे बाजाराच्या नियामकांनी म्हणजे ‘सेबी’ने ही घसरण थांबविण्याकरिता ‘काही तरी करावे’ अशा प्रकारची जोरदार ओरड सुरू होती. जगभरात इतरत्र नियामकांनी लादलेल्या ‘शॉर्ट सेलिंग’वरील बंदीकडे संबंधित लक्ष वेधत असतानाच शुक्रवारी बाजार बंद झाल्यावर ‘सेबी’ने परिपत्रक प्रसिद्ध करत अवास्तव अस्थिरतेला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना घोषित केल्या.

या उपाययोजनांमुळे यापुढे म्युच्युअल फंडांसहित अन्य संस्थात्मक आणि मोठी उलाढाल करणाऱ्या गुंतवणूकदारांना निफ्टी फ्युचर्स किंवा अन्य निर्देशांकावर आधारित फ्युचर्सच्या ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खरेदी व्यवहारांसाठी रोकड, सरकारी रोखे किंवा बँकांच्या मुदत ठेवींसारखी अन्य रोकडसुलभ साधनांच्या रूपात तारण ठेवण्यास सांगितले आहे. याचा अर्थ एखाद्या संस्थात्मक गुंतवणूकदाराला निफ्टी किंवा इतर निर्देशांकावरील फ्युचर्समध्ये ५०० कोटींपेक्षा अधिक व्यवहार करावयाचा असेल तर त्याला मार्जनिचा लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ, व्यवहाराचे मूल्य ७०० कोटी रुपये असल्यास, या व्यवहारांच्या पूर्ततेसाठी २०० कोटी रुपये बाजाराकडे (अॅअडिशनल सव्‍‌र्हेलन्स मार्जनि) जमा करावे लागतील. हे २०० कोटी रुपये तीन महिन्यांच्या मुदतीनंतर मिळतील. याव्यतिरिक्त अवास्तव अस्थिरता असणाऱ्या वायद्यातील (एफ अँड ओ) अकरा कंपन्यांच्या समभागातील व्यवहारांवर कडक बंधने घातली आहेत. हे प्रतिबंध आजपासून एका महिन्यासाठी लागू होणार असून व्यवहाराच्या दोन्ही बाजूंच्या (खरेदी आणि विक्री) संस्था आणि व्यक्तींना लागू होतील. ‘सेबी’ने हे परिपत्रकाद्वारे लादलेले निर्बंध गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन हिताचे आहेत. बँक ठेवींवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक परतावा मिळविण्यासाठी ज्या गुंतवणूकदारांनी भारतीय समभागात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवला आहे अशा गुंतवणूकदारांना यातून निश्चितच हायसे वाटावे.

बाजाराच्या अतिरेकी ध्रुवीकरणामुळे मोजक्या समभागांच्या किमतीत झालेली अवास्तव वाढ आणि आणि त्यामुळे निर्देशांकांचे वाढलेले मूल्यांकन पाहता या पातळीवर समभागांच्या किमतीत घसरण होणे बाजारासाठी गरजेचे होते. गेल्या तीन दशकांत भारतीय बाजारातील तेजीला समभागांच्या उत्सर्जनातील (अर्निंग) वाढ कारणीभूत ठरत आली आहे. एप्रिल १९९३ ते फेब्रुवारी २००० पर्यंत चाललेल्या तेजीत बीएसई सेन्सेक्स दुप्पट झाला. या वाढीला औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, माध्यमे, दळणवळण आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या उत्सर्जनातील वाढ कारण ठरली. या सात वर्षांच्या कालावधीत निर्देशांकाच्या वार्षकि वाढीचा दर १५ टक्के, तर निर्देशांकातील कंपन्यांच्या उत्सर्जनातील वाढीचा वार्षकि दर १६.७ टक्के होता. बाजारात जेव्हा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्सर्जनातील वाढीचा दर घटला, त्यामुळे सेन्सेक्सचे उत्सर्जनाशी असलेले प्रमाण (पी/ई) २४ झाले. सेन्सेक्स पी/ई महाग दिसू लागला आणि तेव्हा बाजारात घसरण झाली.

डिसेंबर २००१ ते जानेवारी २००८ या कालावधीतील तेजीतही असेच झाले. सेन्सेक्सचा वार्षकि वाढीचा दर २७ टक्के होता. या कालावधीत सेन्सेक्सच्या वाढीला भांडवली वस्तू, पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता विकासक कंपन्यांच्या १९ टक्क्यांवर असलेली उत्सर्जनातील वाढ कारणीभूत होती. वैश्विक वित्तीय संकटाच्या रूपाने कंपन्यांच्या नफ्याचा वेग घटल्याने तेव्हा सेन्सेक्सचे तत्कालीन मूल्यांकन महाग वाटू लागले आणि पुन्हा घसरण झाली. डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१९ दरम्यान सेन्सेक्सने १३ टक्के वार्षकि वाढ नोंदविली; परंतु सेन्सेक्स कंपन्यांच्या उत्सर्जनातील वाढ जेमतेम ६ टक्के होती. बाजार वरच्या पातळीवर चार वर्षे टिकून राहिला. कारण आर्थिक विश्लेषकांना कंपन्यांच्या उत्सर्जनात अपेक्षित असलेली वाढ. हे केवळ भारतातच झाले असे नाही. जागतिक अर्थव्यवस्थेतील उपलब्ध रोकड सुलभता आणि सुगमतेमुळे जगभरातील विश्लेषकांना कंपन्यांच्या नफ्यात वाढ अपेक्षित होती. डिसेंबर २०१६ नंतर (भारतात निश्चलनीकरण याच कालावधीत झाले.) सेन्सेक्सने तब्बल १७ वेळा २४ तर २० वेळा २० पट पी/ई मूल्यांकनाला गवसणी घातली. उत्सर्जनातील वाढीच्या अभावी झालेल्या घसरणीनंतर निर्देशांकाचे उत्सर्जनाशी प्रमाण आता १७ पट आहे. मूलभूत बाबींचा विचार करता फेरमूल्यांकनाची आवश्यकता होतीच आणि आघाडीच्या कंपन्यांतील ताज्या घसरणीने ती गरज पूर्ण झाली असे वाटते.

प्रत्येक वेळी नव्याने गुंतवणूक करताना मूल्यांकन महत्त्वाचे असते. भारतीय समभागांचे भांडवली मूल्य ११ लाख कोटी रुपये असून यापैकी ६.५ लाख कोटींचे समभाग म्युच्युअल फंडांच्या मालकीचे आहेत. सेन्सेक्स टिकून राहायला गेल्या पाच वर्षांत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात किरकोळ गुंतवणूकदारांनी पैसे ओतले आहेत. समभाग गुंतवणुकीतून १० टक्के परताव्याच्या माफक उद्दिष्टांऐवजी त्यापेक्षा अधिक परताव्याच्या मोहाने मालमत्ता विभाजन, जोखिमांक या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केले. सेन्सेक्सच्या मागील दोन दशकांतील परताव्याची मासिक चलत सरासरी अभ्यासली तर २० पेक्षा जास्त मूल्यांकनावर गुंतवणूक केल्यास पुढील वर्षी पाच टक्क्यांपेक्षा कमी परतावा मिळाला आहे. सेन्सेक्सचे मूल्यांकन १५ ते १८ टक्क्य़ांदरम्यान असताना केलेल्या गुंतवणुकीने १० वर्षांतील सर्वोत्तम परतावा दिलेला आहे. मागील २५ वर्षांत अशी संधी २००१ मध्ये जागतिक व्यापार केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर आणि २००८ मधील वैश्विक वित्तीय संकटामुळे झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांना मिळाली होती. समभाग गुंतवणुकीसाठी संधीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना ही संधी सध्या अनायासे प्राप्त झाली आहे.

जेव्हा जेव्हा मोठी घसरण होते तेव्हा तेव्हा गुंतवणूकदार समभाग गुंतवणुकीचा विचार मनातून काढून टाकतात. ‘अॅ म्फी’च्या उपलब्ध आकडेवारीनुसार ‘एसआयपी’ माध्यमातून म्युच्युअल फंडात होणारी वार्षकि गुंतवणूक २०१७ मधील ४३,९२१ कोटींवरून आता १ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘एसआयपी’चा उद्देश घटलेल्या किमतीत खरेदी करून खरेदीची सरासरी कमी करणे हा आहे. बाजारपेठेत किरकोळ गुंतवणूकदारांचे हित हे ‘एसआयपी’ न थांबविता सरासरी साधण्यात आहे. ‘सेबी’ने उचललेली पावले योग्य असून बाजारपेठेतील जोखीम व्यवस्थापन प्रणाली सुदृढ आणि सुव्यवस्थित करण्याचे काम ते करतील, जेणेकरून संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विशिष्ट मर्यादेपलीकडे बाजार नियंत्रित करण्याच्या उद्देशाला खीळ घातली गेली आहे. या कठीण काळात जुन्या गोष्टी नव्याने तपासून पाहण्याची संधी मिळाली आहे. आपल्या मालमत्ता विभाजनावर विश्वास ठेवा. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ आवश्कता नसेल असेच पैसे समभागांत गुंतवा आणि ‘म्युच्युअल फंड सही है’चे व्हिडीओ नव्याने आणि जागरूकतेने पाहा. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल यावर अढळ विश्वास ठेवा.

shreeyachebaba@gmail.com

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती  देणारे साप्ताहिक सदर