व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लि.

(बीएसई कोड – ५३२७५७)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,१५२

वर्ष १९६७ मध्ये ललितकुमार पटेल यांनी बडोदे येथे स्थापन केलेली व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स आज देशातील एक आघाडीची ट्रान्सफॉर्मर उत्पादक कंपनी आहे. कंपनी १६० एमव्हीएपर्यंतचे ऑइल फिल्ड पॉवर आणि वितरण ट्रान्सफॉर्मर्स, २२० केव्ही क्लास, ११ केव्ही वर्ग (मोरा, जर्मनी, तांत्रिक सहकार्याने) आणि कास्ट रेजिन ड्राई टाइप ट्रान्सफॉर्मर्स १२.५ उत्पादित करते. तसेच एचटीटी, जर्मनीच्या तांत्रिक सहकार्याने एमव्हीए, के ३३ क्लासचे उत्पादन करते. कंपनीचे गुजरातमधील बडोदे येथे दोन उत्पादन प्रकल्प असून एकूण स्थापित क्षमता प्रतिवर्षी १३,००० एमव्हीए आहे.

उत्तम सेवा तसेच गुणवत्तेमुळे कंपनीकडे ग्राहकांची मांदियाळी आहे ज्यामध्ये प्रामुख्याने शासकीय आणि निमसरकारी प्रकल्प, रिफायनरी, खत प्रकल्प, ऊर्जा क्षेत्र, फार्मा, पेपर, स्टील, सिमेंट क्षेत्र इत्यादींचा समावेश आहे. भारत तसेच परदेशातही उद्योग व राज्य विद्युत मंडळे यांचाही त्यात समावेश आहे. सध्याच्या वार्षिक विक्रीपैकी ८० टक्के विक्री प्रकल्प व्यवसायातील आहेत. बहुतेक प्रकल्पांमध्ये, ट्रान्सफॉर्मर ऑर्डर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित अग्रणी सल्लागारांद्वारे आहेत – इंजिनीअर्स इंडिया, बेचेल, मेकन, फिशर्नर कन्सिल्टग इिंजनीअर यांचा समावेश आहे. एबीबी, सीमेन्स, एल अ‍ॅण्ड टी इत्यादी कंपन्या त्यांच्या औद्योगिक आणि स्विचयार्ड पॅकेज प्रकल्पांसाठी कंपनीच्या नियमित ग्राहक आहेत.

डिसेंबर २०१९ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. या कालावधीत कंपनीने २५१.३३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३५.०४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत तो तब्बल ५८ टक्क्यांनी अधिक आहे. सध्या कंपनीकडे ४४८ कोटी रुपयांच्या प्रलंबित ऑर्डर आहेत. मंदीच्या वातावरणातही ऊर्जा, केमिकल्स, तेल आणि वायू, स्टील तसेच रेल्वे आणि मेट्रो आदी क्षेत्रांतून कंपनीच्या उत्पादनांना चांगल्या मागणीची अपेक्षा आहे. कुठलेही कर्ज नसलेली व्होल्टॅम्प ट्रान्सफॉरमर्स म्हणूनच आकर्षक खरेदी ठरते.

सुचविलेले शेअर्स सद्य बाजार परिस्थितीत कमी भावात मिळू शकतात. म्हणून खरेदी करते वेळी बाजाराचा कल पाहून कटाक्षाने टप्प्याटप्प्यानेच खरेदी करावेत.

स्मॉल कॅप

प्रवर्तक : ललितकुमार पटेल

उद्योग क्षेत्र : अभियांत्रिकी

बाजार भांडवल : रु. १,१६६  कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  १,४८३/९३७

भागभांडवल : रु. १०.१२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ५०.००

परदेशी गुंतवणूकदार  १५.६२

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २१.३०

इतर/ जनता    १३.०८

पुस्तकी मूल्य : रु. ६७८.६

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश : २२५%

प्रति समभाग उत्पन्न :  रु. १०६.७४

पी/ई गुणोत्तर :     ११.६

समग्र पी/ई गुणोत्तर :    १५.१८

डेट इक्विटी गुणोत्तर :    ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २०९

रिटर्न ऑन कॅपिटल : १८.४३

बीटा :    ०.९