फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    :    गुंतवणुकीसाठी कायम खुली असलला समभाग व रोखे गुंतवणूक करणारा ( ओपन एंडेड इक्विटी फंड)
जोखीम प्रकार     :    रोखे व समभाग गुंतवणूक असल्याने जोखीम मध्यम (मुद्दलाची खात्री नाही)
गुंतवणूक    :    समभाग, इक्विटी डेरिव्हेटिव्हज व उच्च पत मानांकन असणारे रोखे
निधी व्यवस्थापक     :    या फंडाच्या समभाग गुंतवणुकीचे व्यवस्थापन जिनेश गोपानी तर स्थिर उत्पन्न प्रकारच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन आर शिवकुमार हे पाहणार आहेत. जिनेश गोपानी हे अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक होते. ते मुंबई विद्यापीठाचे व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवीधारक आहेत. आर शिवकुमार हे अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी सुंदरम म्युच्युअल फंड व एबीएन अ‍ॅम्रो म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक होते. त्यांनी आपली अभियांत्रिकी पदवी आयआयटी मद्रास येथून तर व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका आयआयएम अहमदाबादमधूून मिळविली आहे.
गुंतवणूक पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती    :    या फंडाच्या दहा रुपये मूल्य असलेल्या युनिट्सची प्रारंभिकविक्री (एनएफओ) २७ जुल ते १० ऑगस्टदरम्यान सुरू     राहणार असून, २० ऑगस्टपासून हा फंड फेरखरेदीसएनएव्हीनुसार खुला होईल. ‘क्रिसिल एमआयपी ब्लेंडेड फंड इंडेक्स’ हा निर्देशांक या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
हा फंड ‘ओपन एन्डेड इक्विटी फंड’ या प्रकारात मोडणारा फंड आहे. हा फंड समभाग केंद्रित फंड असून हा फंडाच्या एकूण निधीपकी जास्तीत जास्त ४५ टक्के निधी समभाग गुंतवणुकीत असेल. उर्वरित निधी इक्विटी अर्बट्रिाज व स्थिर उत्पन्न देणारे रोखे यामध्ये गुंतविला जाईल. फंड घराण्याने केलेल्या संशोधनानुसार एखाद्या गुंतवणुकीच्या परताव्याचा दर प्रामुख्याने विविध प्रकारच्या गुंतवणूक साधनांच्या प्रमाणावर (Asset Allocation) अवलंबून असते. गुंतवणुकीवर सर्वसाधारण परताव्याचा दर मिळविण्यासाठी हा फंड आपली सर्वाधिक गुंतवणूक समभागात केली तरी जोखीम नियंत्रणासाठी हा फंड रोखे व इक्विटी अर्बट्रिाज या प्रकारच्या गुंतवणुकीत निधी गुंतवेल. साहजिकच गुंतवणुकीच्या तीन साधनांचा समावेश असलेल्या या फंडातील गुंतवणुकीची जोखीम अन्य इक्विटी फंडांच्या तुलनेत नियंत्रित असेल. जगभरात या प्रकारच्या म्हणजे एकाहून अधिक प्रकारच्या गुंतवणूक साधनांचा वापर करणाऱ्या फंडांना  लोकमान्यता मिळाली आहे.

अमेरिकेत दहा वर्षांपूर्वी ‘मल्टी अ‍ॅसेट फंड’ या संकल्पनेचा उगम झाला. रोखे व समभाग या गुंतवणूक साधनांचा प्राथमिक समावेश असलेले बॅलेन्स्ड फंड या संकल्पनेतून जिन्नस आदी अन्य गुंतवणूक साधनांचा समावेश करून ‘मल्टी अ‍ॅसेट फंड’ ही संकल्पना जन्मास आली व लोकप्रियही झाली. याच प्रकारच्या फंडांची सुधारीत आवृत्ती असलेला हा फंड प्रकार आहे.
गुंतवणुकीत वेळ साधता येते असे मानणाऱ्यांचा एक वर्ग आहे. ही वेळ साधल्याने गुंतवणुकीवरील परताव्याचा दर अव्वल ठरतो असे या वर्गातील गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. हा वर्ग आपला निधी विविध उपलब्ध गुंतवणूक साधनांतून उदाहरणार्थ रोखे, समभाग, जिन्नस (कमॉडिटी), ‘इक्विटी अर्बट्रिाज’, ‘इंटरेस्ट रेट डेरिव्हेटीव्हज’, परकीय चलन वगैरे विविध गुंतवणूक साधनांतून आपला पैसा फिरवत असतो. उल्लेख केलेली ही सर्वच गुंतवणूक साधने भारतात उपलब्ध नाहीत. उदारणार्थ रुपया हे चलन पूर्ण परिवर्तनीय नसल्याने डॉलरमध्ये गुंतवणूक करणे शक्य नसते.परंतु उपलब्ध गुंतवणूक साधनांचा समावेश आपल्या गुंतवणुकीत करण्यासाठी गुंतवणूकदार या प्रकारच्या इक्विटी ओरिएन्टेड फंड’ या संकल्पनेचा वापर करू शकतात. मागील १८ महिन्यांत समभाग व रोखे गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्याच्या दर समाधानकारक आहे. असाच दर भविष्यात मिळेलच याची खात्री देता येत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक आवर्तनानुसार आपल्या मालमत्ता उपलब्ध प्रकारात गुंतविणे वैयक्तिक गुंतवणूकदारांना शक्य असेलच असे नाही. साहजिकच असे गुंतवणूकदार ज्यांना आवर्तनाच्या दिशेनुसार ‘भाकरी परतता’ येणे शक्य होत नाही अशा गुंतवणूकदारांनी या प्रकारच्या फंडाचा विचार करणे हिताचे असते. या फंडाचे धोरण परताव्याच्या दरात सातत्य राखण्यासोबतच जोखीम नियंत्रणाला असणार आहे.
अ‍ॅक्सिस लॉंग टर्म इक्विटी व अ‍ॅक्सिस इक्विटी फंड, अ‍ॅक्सिस डायनॅमिक बॉंड फंड या सारख्या यशस्वी योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या निधी व्यवस्थापकांच्या कौशल्याचा संगम या योजनेत अनुभवता येईल असे मानण्यास नक्कीच वाव आहे. परताव्याचे सातत्य व भांडवलवृद्धी या बरोबरीनेच नियंत्रित जोखीम घेऊ पाहणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणुकीचा विचार करावयास हवा.

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचा भर हा गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याबरोबरच जोखीम व्यवस्थापनाला प्राधान्याचाही आहे. याच भूमिकेतून आमच्या अ‍ॅक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंड किंवा अ‍ॅक्सिस इक्विटी फंड यांचे व्यवस्थापन केले जाते. या योजनांप्रमाणे ही योजनादेखील गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरेल, याची खात्री आहे.
चंद्रेश निगम
व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी,
अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड

mutualfund.arthvruttant@gmail.com