|| आशीष ठाकूर

गेल्या लेखातील वाक्य होते – निर्देशांकाची वाटचाल ही सेन्सेक्सवर ३९,५०० व निफ्टीवर ११,८०० अशी असेल. हा स्तर पार करण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांक पुन्हा सेन्सेक्सवर ३८,४०० व निफ्टीवर ११,४५० पर्यंत खाली येऊ शकतो. या वाक्याची प्रचीती आपण सरलेल्या आठवडय़ात घेतली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ३८,३३७.०१  निफ्टी : ११,४१९.२५

येणाऱ्या दिवसात बाजारात एक क्षीण स्वरूपाची सुधारणा अपेक्षित आहे. जिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,५०० आणि निफ्टीवर ११,५०० अशी असेल. या स्तरावरून पुन्हा मंदीचे आवर्तन सुरू होऊन खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३७,००० ते ३६,००० आणि निफ्टीवर ११,१०० ते १०,८०० असे असेल.

एप्रिल २०१९ पासून सुरू झालेले, कंपन्यांचे तिमाही वित्तीय निकाल, ते जाहीर होण्याअगोदर गुंतवणूकदारांची मानसिक तयारी होण्यासाठी साधी, सोपी, पण उद्देश साध्य करणारी ‘महत्वाचा केंद्रिबदू स्तर’ पध्दत विकसित केली. त्याची विश्वासार्हता गेल्या हंगामात येस बँकेने दिली, तर आता डीएचएफएलने.

डीएचएफएल बाबत ८ जुलच्या लेखातील वाक्य होत.. समभागाची आर्थिक प्रकृती तोळामासाच आहे. त्यामुळे डीएचएफएलचा तिमाही निकाल हा वैद्यकीय परिभाषेतच समजून घ्यावा लागेल.त्या वेळेला डीएचएफएलचा बंद भाव ८० रुपये होता. वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर समभागाचा बाजारभाव ७५ वरून ५० रुपयांवर आल्यास समभागाची प्रकृती जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेन्टिलेटरवर) आहे असे समाजावे.

१३ जुलला प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर संचालक मंडळाच भाष्य होते – कंपनीला २,२०० कोटी रुपयांचा तोटा झाल्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यात लवकर सुधारणा होण्याची शक्यता फारच कमी आहे, असे संचालक मंडळाचे मत. निकाल जाहीर होण्याअगोदर, मी फक्त एकच शब्द वापरला – ‘व्हेन्टिलेटर’ या दोहोंचा अर्थ एकच. ‘महत्वाचा केंद्रिबदू स्तर’ पध्दतीच हे यश आहे असे समजायला हरकत नाही.

निकाल हंगामाचा वेध..

१)  लार्सन अँण्ड टुब्रो

  • तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, २३ जुल
  • शुक्रवार, १९ जुलचा बंद भाव – १,४११.५५ रुपये
  • निकालानंतरचा महत्वाचा केंद्रिबदू स्तर – १,३८० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,३८० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,४७० रुपये. भविष्यात १,४७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,६०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल. ब) सर्वसाधारण निकाल : १,३८० ते १,४७० रुपयांच्या पट्टयात वाटचाल. क) निराशादायक निकाल : १,३८० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,३०० व त्यानंतर १,२०० पर्यंत घसरण.

२) एशियन पेंट्स

  • तिमाही निकालाची तारीख – बुधवार, २४ जुल
  • शुक्रवार, १९ जुलचा बंद भाव – १,३६९.१० रुपये
  • निकालानंतरचा महत्वाचा केंद्रिबदू स्तर – १,३७० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने १,३७० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,४४० रुपये. भविष्यात १,४४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,५३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल. ब) सर्वसाधारण निकाल : १,३७० ते १,४४० रुपयांच्या पट्टयात वाटचाल. क) निराशादायक निकाल : १,३७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,३२० व त्यानंतर १,२२० पर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com