05 June 2020

News Flash

विकल्पच विकल्प..

मागे आपण शेअर्स व फ्युचर्सबद्दल माहिती घेतली. आजच्या व पुढील भागांमध्ये विकल्पाबद्दल (Options) अभ्यास करू.

| February 2, 2015 01:02 am

मागे आपण शेअर्स व फ्युचर्सबद्दल माहिती घेतली. आजच्या व पुढील भागांमध्ये विकल्पाबद्दल (Options) अभ्यास करू.
विकल्प (Options) : हा भांडवली बाजारामधील सर्वात जुना प्रकार आहे. इसवी सन ३३२ मध्ये या प्रकारचा उल्लेख आढळतो. ग्रीस प्रांतातला थेल्स ही व्यक्ती हंगामापूर्वी ऑलिव्ह (olive) खरेदी करण्याचे अधिकार विकत घेई व त्यात तिने प्रचंड पसाही कमावला.
ऑप्शन्स म्हणजे विकल्प किवा पर्याय. हे फुचर्स व कॅश मार्केटपेक्षा अगदी वेगळे आहे. ऑप्शन्स या प्रकारामध्ये प्रत्यक्ष वस्तूची खरेदी विक्री न करता भविष्यामध्ये विशिष्ट भावामध्ये खरेदी किवा विक्री करण्याचे अधिकार खरेदी करणे किवा विकणे होय. त्या करिता अधिकार विकत घेणाऱ्याला काही अत्यल्प रक्कम ही अधिकार विकणाऱ्याला द्यावी लागे. यालाच प्रिमिअम म्हणतो. प्रिमिअम भरून ऑप्शन्स खरेदीदार शेअर्स खरेदीचा किवा विक्रीचा अधिकार विकत घेतो. परंतु कोणतीही जबाबदारी घेत नाही.
१६३६ च्या दरम्यान तुलिप नावांच्या व्यवहारामध्ये युरोप येथे ऑप्शन्स चा फार मोठय़ा प्रमाणात उपयोग झाला. खरेदी करण्याचा अधिकार एकदा घेतला की तो ते अधिकार दुसऱ्याला विकायचा आणि दुसऱ्याने तिसऱ्याला तसेच विक्री करण्याचा अधिकार एकाने दुसऱ्याला व दुसऱ्याने तिसऱ्याला विकण्याचा प्रकार होऊन त्यात खूप मोठा सट्टा होत असे.
भारतामध्ये एनएसई व बीएसई या शेअर बाजारामध्ये (Stock Exchange ) जून २००१ ला निर्देशांकांमध्ये व तसेच जुल २००१ मध्ये स्वतंत्र शेअर्स मध्ये विकल्प (Options) या प्रकारामध्ये व्यवहार करण्यास मान्यता दिली व बाजार रितसर सुरू झाला. आज जवळपास प्रतिदिन दीड लाख कोटींहून अधिक आहे. यावरून विकल्पाची लोकप्रियता लक्ष्यात येते व ही लोकप्रियता सतत वाढतच आहे.
खरेदीदार खालीलप्रमाणे दोन प्रकारचे अधिकार विकत घेऊ शकतो. अधिकार विकत घेण्यासाठी त्याला प्रिमियम त्यावे लागते व हे प्रिमियम विक्रेत्याच्या खात्यामध्ये जमा होतो.
कॉल ऑप्शन्स : शेअर्स किवा निर्देशांक विकत घेण्याच्या अधिकारास कॉल ऑप्शन्स म्हणतात. म्हणजे एखाद्याला जर मार्केट/शेअर्सचे भाव वाढतील असे वाटले तर तो खरेदीचा अधिकार म्हणजेच कॉल खरेदी करेल. कारण बाजार वाढेल तसा कॉलचा भाव वाढेल व कमी किमतीला घेतलेला कॉल जास्त किंमतीमध्ये विकून नफा कमावेल.
एक साधे उदाहरण घेऊ – स्टेट बँक ऑफ इंडियाचा भाव ३१६ रुपये आहे. मला वाटते की येत्या काही दिवसात स्टेट बँक ऑफ इंडियाचा भाव वाढणार आहे त्यामुळे मी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स विकत घेऊ शकतो; परंतु त्यासाठी लागणारी गुंतवणूक मोठी आहे. मी फ्युचर्सही खरेदी करू शकतो. त्यासाठीदेखील लागणारी १५% मार्जीन जास्त वाटते. अशा वेळी मी कॉल विकत घेईन.
av-06स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सची  ३१६ रुपये किंमत पाहता बँकेचा स्ट्राईक ३२० च्या कॉलचा भाव रु. ८ आहे. तो कॉल विकत घेतला आणि जर एक्सपायरीला शेअर्स किमत ३५० रुपये असेल, माझ्या स्ट्राईक भावापेक्षा जास्त असेल. तर मला प्रति शेअर्स रु. २२ (एक्सपायरी किंमत म्हणजेच एक्सपायरीला असलेली शेअर्सची किमत – स्ट्राईक भाव –  प्रिमिअम) म्हणजेच (२२* १२५० = रु. २७,५००) फायदा होईल जर स्ट्राईक भावापेक्षा खाली बंद झाला तर अधिकतर नुकसान ८ होईल. एक्सपायरीपूर्वी शेअर्सचा भाव वाढतो वा कमी होतो. त्यानुसार माझा नफा – तोटा घेऊन व्यवहार बंद करू शकतो.
वरील उदाहरणानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाची लॉट संख्या १२५० असल्याने जास्तीत जास्त फायदा रु. २७,५०० आणि तोटा जास्तीत जास्त रु. १०,००० होईल.
पुट ऑप्शन्स : शेअर्स किवा निर्देशांक विकण्याच्या अधिकारास पुट ऑप्शन्स म्हणतात. जर एखाद्याला असे वाटत असेल की निर्देशांक किवा शेअर्सचे भाव कमी होतील तर तो विकण्याचा अधिकार म्हणजे पुट विकत घेईल व जसे जसे भाव खाली उतरतील तसा तसा पुटचा भाव वाढेल व कमी किमतीत घेतलेले पुट जास्त किमतीला विकून नफा कमवेल.
आणखी एक उदाहरण घेऊ – स्टेट बँक ऑफ इंडिया चा आजचा भाव ३१६ रुपये आहे. येणाऱ्या काही दिवसात मला वाटते की, स्टेट बँक ऑफ इंडियाचा भाव कमी होणार आहे तर मी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स विकू शकत नाही. कारण माझ्याकडे शेअर्स नाहीत. तसेच मी फ्युचर्स विकू शकतो. पण त्यासाठी लागणारी १५% मार्जीन मला जास्त वाटते. अशावेळी मी पूट विकत घेईन. स्टेट बँक ऑफ इंडियाची शेअर्स किमत आज ३१६ रुपये आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्ट्राईक ३१० च्या पुटचा भाव रु. ६ आहे व शेअर्स संख्या (Lot Size) १२५० आहे. तो सदर पुट विकत घेतला आणि जर एक्सपायरीला शेअर्सची किंमत २८५ रुपये असेल. म्हणजे माझ्या स्ट्राईक भावापेक्षा कमी असेल तर मला एकंदर प्रती शेअर्स रु. १९ (स्ट्राईक भाव – एक्सपायरी किंमत म्हणजेच एक्सपायरीला असलेली शेअर्सची किमत – प्रिमिअम) म्हणजेच (१९* १२५० = रु. २३,७५०) फायदा होईल. जर स्ट्राईक भावापेक्षा वर बंद झाला तर माझे जास्तीत जास्त नुकसान रु. ७,५०० होईल. एक्सपायरी पूर्वी शेअर्सचा भाव वाढतो किंवा कमी होतो त्यानुसार माझा नफा – तोटा घेऊन व्यवहार बंद करू शकतो.
(या अभ्यास वर्गामध्ये काही शब्द जसे पुट, स्ट्राईक, अधिमूल्य (Premium), नफा – तोटय़ाचे गणित इत्यादी आलेले आहेत. सदर शब्द तसेच इतर संकल्पना/व्याख्या इत्यादींचा अभ्यास आपण पुढील भागात करू.)
primeaocm@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2015 1:02 am

Web Title: economy knowledge
टॅग Arthvrutant,Economy
Next Stories
1 नागरी सहकारी बँका
2 नफा/तोटा.. अमर्याद!
3 लखलखीत काळ!
Just Now!
X