News Flash

चुकीचे परिमार्जन

पूर्वीच्या काळात बहुतांशी लोक, मुख्यत्वे नोकरदार वर्ग, आपल्या बचतीचे पसे बँक किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवीत असत. त्याच बरोबरीने मित्र किंवा नातेवाईक असलेला विमा विक्रेता

| September 15, 2014 01:07 am

 पूर्वीच्या काळात बहुतांशी लोक, मुख्यत्वे नोकरदार वर्ग, आपल्या बचतीचे पसे बँक किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवीत असत. त्याच बरोबरीने मित्र किंवा नातेवाईक असलेला विमा विक्रेता सुचवेल ती जीवन विमा पॉलिसी घेत. विम्यामागची विचारसरणी अशी की, आपली मूळ रक्कम सुरक्षित ठेवायची आणि त्यावर जे काही मिळेल ते घेत राहायचे. ती पिढी आजही आपल्या मुलांना तशाच प्रकारचा उपदेश करते. नोकरीचा पहिला पगार हाती आला की एखादे रिकिरग डिपॉझिट सुरूकरायचा सल्ला दिला जातो. माहितीचा विमा विक्रेता येतो आणि अवाच्या सव्वा परताव्याचे अमिष दाखवून एखादी विमा पॉलिसी गळयात मारतो. तो एकच पॉलिसी देऊन थांबत नाही तर रिकिरग डिपॉझिटपेक्षा विमा पॉलिसी किती सरस आहे ते पटवून देतो. त्या अनभिज्ञ गुंतवणूकदाराला आणखी तीन चार पॉलिसी विकतो.

अशाच विचारसरणीत वाढलेला विरारचा धीरज मडावी. आजचे वय २३ वष्रे. वयाच्या २० व्या वर्षी नोकरीस सुरुवात केल्याबरोबर एका विमा विक्रेत्याने त्याच्याशी संपर्क साधून एलआयसीची त्या वेळेची ‘हॉट फेव्हरिट’ पॉलिसी – जीवन सरल त्याला घ्यायला लावली. (ही जीवन सरल १ जानेवारी २०१४ पासून ही पॉलिसी बंद करण्यात आलेली आहे) ही धीरजच्या आयुष्यातील पहिली पॉलिसी. पॉलिसीची टर्म २१ वष्रे; वार्षकि प्रिमियम ६,००५ रु. (डबल अॅक्सिडंट बेनिफिट सकट), मूळ विमाछत्र १,२५,००० रुपये.

त्यावेळी त्याला एक तख्ताही दाखविण्यात आला. त्यानुसार २१ वर्षांनंतर म्हणजे धीरजच्या वयाच्या ४२ व्या वर्षी त्याला ४,४७,२९१ रु. मिळतील असे आश्वासन दिले गेले. त्या विक्रेत्यावर पूर्ण विश्वास असल्याने पॉलिसीच्या कागदपत्रांवर (करारावरील) ‘पूर्णावधी विमाधन-इील्लीऋ्र३’ या शीर्षकाखाली दर्शविण्यात आलेली १,४८,९१५ रु. ही रक्कम बघण्याची तसदी त्याने घेतली नाही.

सुमारे दोन वर्षांनी त्याच विक्रेत्याने २८ मार्च २०१३ रोजी धीरजला आणखी तीन विमा पॉलिसी विकल्या. त्यावेळी त्याचे वय होते २२ वष्रे.
 

पॉलिसींचा तपशील:

पॉलिसी दुसरी-

‘जीवन तरंग’-  टर्म २० वष्रे, मासिक प्रिमियम १,२७१ रु. (डबल अॅक्सिडंट बेनिफिट सकट), मूळ विमाछत्राची रक्कम ३,००,००० रुपये.

पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर धीरजला त्याच्या खात्यात जमा झालेला बोनस प्राप्त होणार. त्यानंतर दरवर्षी विमाछत्राच्या ५.५० टक्के इतकी रक्कम त्याला देण्यात येणार. तो जर १०० वर्षांपर्यंत जगला तर त्यानंतरच्या वर्षी मूळ विमाछत्राची रक्कम आणि लॉयल्टी बोनस त्याला देण्यात येणार.

 

पॉलिसी तिसरी

* ‘न्यू विमा गोल्ड’- टर्म २० वष्रे, मासिक प्रिमियम ८७७ रु. (डबल अॅक्सिडंट बेनिफिट सकट), मूळ विमाछत्राची रक्कम ३,००,००० रु. 

या पॉलिसीची २० वर्षांची टर्म संपली तरी पुढील १० वर्षे १,५०,००० रुपयांचे (निम्मे) विमाछत्र सुरूच राहणार. पॉलिसीच्या चार, आठ, १२ आणि १६ व्या वर्षी विमाछत्राच्या १० टक्के इतकी रक्कम धीरजला देण्यात येणार. पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर विमाधारकाने जमा केलेल्या मूळ प्रिमियमची रक्कम अधिक लॉयल्टी बोनस वजा पूर्वी दिलेली रक्कम त्याला देण्यात येणार.

     

  पॉलिसी चौथी

*  ‘जीवन सरल’-  टर्म ३५ वर्षे, मासिक प्रिमियम २,०४२ रु. (डबल अॅक्सिडंट बेनिफिट सकट), मूळ विमाछत्राची रक्कम ५,००,००० रु.

विक्रेत्याने दाखविलेल्या तक्त्यानुसार, पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर विमाधारकाला प्राप्त होणारी रक्कम ७३,४२,२०३ रुपये होती. पॉलिसीच्या प्रत्यक्ष कागदपत्रांवर नमूद केलेली रक्कम १०,६५,२२० रुपये आहे. त्याचबरोबर विमाछत्राची पाच लाख रुपयांची रक्कम जमेस धरली तर त्याला त्याच्या वयाच्या ५८ व्या वर्षी १६,१५,२२० रुपयांची प्राप्ती होणार.

धीरजच्या सध्या चालू असलेल्या पॉलिसींचा गोषवारा सोबत जोडला आहे. त्यावर नजर टाकली तर असे दिसून येते की त्याच्या वयाच्या ४२ व्या वर्षी त्याला २.७४ रुपये एकुणात प्राप्त होणार, ४३ व्या वर्षी सुमारे ९.९७ लाख रुपये आणि ५८ व्या वर्षी सुमारे १६.१५ लाख रुपये प्राप्त होणार.

धीरज मडावीचे आजचे वय आहे २३ वष्रे आहे. सध्याच्या पॉलिसींमधून – ज्या त्याच्या माथी मारल्या गेल्याचे त्याचे म्हणणे आहे- त्याला जर सुटका करून घ्यायची असेल तर पहिल्या पॉलिसीचे त्याने तीन वष्रे प्रिमियम भरले आहे. त्यामुळे त्याला काहीतरी रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. इतर तीन पॉलिसीचे त्याने १७ महिने प्रिमियम भरले आहे.  त्यामुळे त्याला काहीही परत मिळणार नाही. समजा त्याच्या चारही पॉलिसींसाठी आजपर्यंत भरलेल्या रकमेवर त्याने पाणी सोडले तर त्याचे आजचे नुकसान ९५,४२० रुपयांचे आहे. आज तो दरवर्षी ५६,२८५ रुपये इतकी रक्कम सध्याच्या पॉलिसींच्या प्रिमियमपोटी भरतो आहे. त्या रकमेमध्ये त्याला जास्तीचे विमाछत्र आणि जास्त प्रमाणात गंगाजळी प्राप्त होऊ शकते का त्याचा आढावा घेऊया.

त्याने जर उच्च प्रतीचा क्लेम सेंटलमेंट रेशिओ असलेल्या कंपनीची ३० वर्षांच्या टर्मची आणि ५० लाख रु. विमाछत्राची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर त्याच्या वार्षकि प्रिमियमची रक्कम होते ५,६०० रुपये. सध्याच्या प्रिमियमच्या एकूण रकमेच्या तुलनेत ५०.८२५ रुपयांची तो बचत करू शकेल. ही रक्कम त्याने दरवर्षी आयकरात सूट मिळणाऱ्या ठोस परताव्याच्या पर्यायामध्ये २० वष्रे गुंतविली तर त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षी त्याच्याजवळ खात्रीलायक अशी २७,२२,३९१ रुपये इतकी गंगाजळी तयार होते.

त्यामधून त्याने सध्याच्या तीन पॉलिसींपासून ४३ व्या वर्षी मिळणारी १२,७१,००० रु. इतकी रक्कम इतर खर्चासाठी वापरली तर त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षी त्याच्या आयकर बचतीच्या खात्यामध्ये बाकी राहिलेली रक्कम होते १४,५१,३९१ रुपये. धीरजच्या चौथ्या पॉलिसीसाठी तो पुढील पंधरा वष्रे २४,५०० रुपयांचे वार्षकि प्रिमियम भरणार होता. त्यापकी ५,६०० रु. त्याला नवीन पॉलिसीच्या प्रिमियमपोटी भरावे लागणार आहेत. बाकी रक्कम (१९,९०० रु.) त्याने पुढील १५ वर्षांसाठी पूर्वीच्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीच्या पर्यायाच्या खात्यामध्ये दरवर्षी गुंतविली तर ५८ व्या वर्षी त्याची गंगाजळी होते ५७,४५,९३७ रुपये. (त्याला पूर्वीच्या पॉलिसीचे सुमारे १६,१५,००० रु. प्राप्त होणार होते.) त्याने पूर्वनियोजीत जोखीम घेऊन आयकर बचतीच्या इतर पर्यायांमध्ये गुंतवणुक केली तर त्याच्या वयाच्या ५८ व्या वर्षीची सुमारे दीड कोटी रुपये इतकी गंगाजळी होऊ शकते.

थोडक्यात धीरजला तितक्याच पशांमध्ये सुमारे चौपट विमाछत्र मिळू शकते आणि कितीतरी जास्त प्रमाणात गंगाजळी तो तयार करू शकतो. हे सर्व का? तर त्याने वेळीच निर्णय घेऊन आजपर्यंत जमा केलेल्या प्रिमियमच्या रकमेवर (९५,४२० रुपये) पाणी सोडले म्हणून. केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याऐवजी नुकसानच जर तो कवटाळत बसला असता तर भविष्यात आणखी मोठे नुकसान त्याने ओढवून घेतले असते.

     

(प्रस्तुत लेखक गुंतवणुक व विमा सल्लागार असून, त्यांचा सदर लेख प्रत्यक्ष घटनेवर आधारित आहे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:07 am

Web Title: how to fix your monetary mistakes
Next Stories
1 आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा
2 ‘पीपीपी’संधी खुणावतायत!
3 माझा पोर्टफोलियो
Just Now!
X