News Flash

गुंतवणुकीच्या ‘डॉक्टर’!

म्युच्युअल फंड निवडीचे अनेक वेगवेगळे निकष असले तरी मागील काळातील परतावा हाच सर्वात महत्त्वाचा निकष असावा

| November 24, 2014 06:59 am

गुंतवणुकीच्या ‘डॉक्टर’!

म्युच्युअल फंड निवडीचे अनेक वेगवेगळे निकष असले तरी मागील काळातील परतावा हाच सर्वात महत्त्वाचा निकष असावा, असे म्युच्युअल फंडांची ऑनलाइन खरेदी-विक्रीची सुविधा पुरविणारा मंच- ‘फंडस् सुपरमार्ट डॉट कॉम’च्या संशोधन प्रमुख रेणू पोथेन सुचवितात. त्यांच्या संशोधन व मूल्यांकनाच्या पद्धतीविषयी झालेली ही बातचीत..
फंड्स सुपरमार्ट डॉट कॉमचे स्वरूप काय आहे?  
रेणू पोथेन : फंड्स सुपरमार्ट डॉट कॉम हे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड ऑनलाइन खरेदी-विक्रीची सुविधा पुरविणारे एक पोर्टल असून ‘आय फास्ट फायनान्शियल इंडिया प्रा. लि.’ या कंपनीने ते उपलब्ध करून दिले आहे. भारतामध्ये २००९ पासून हे पोर्टल गुंतवणूकदारांच्या सेवेत आहे.  म्युच्युअल फंड गुंतवणूकविषयक निर्णय कोणाच्याही मदतीशिवाय गुंतवणूकदारास स्वत:चा स्वत: करता यावा यासाठी पोर्टलच्या वापराची आम्ही शिफारस करीत असतो.  
ग्राहकांना म्युच्युअल फंडांच्या योजनांची तुमच्या संशोधनानुसार ्रशिफारस करीत असता. ही तुमची संशोधन पद्धती कशी आहे?
रेणू पोथेन: आजच्या घडीला सेबीकडे नोंदणीकृत ४१ मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एएमसी) आहेत. या कंपन्यांच्या तीन हजाराहून अधिक योजना आहेत. यातून योग्य योजनेची निवड करण्यासाठी पहिल्या टप्प्यात योजनांना दोन निकष लावले जातात. योजनेची मालमत्ता ५० कोटींहून अधिक हवी हा पहिला निकष आहे. योजनेने तीन वष्रे पूर्ण केलेली असावीत हा दुसरा निकष आहे.
आमच्या संशोधन पद्धतीत (Research Methodology) सर्वात जास्त महत्त्व योजनेच्या परताव्याला आहे. आमच्या संशोधन पद्धतीत आम्ही सर्वात जास्त महत्त्व मागील एक, दोन, तीन, चार व पाच वर्षांच्या परताव्याला देतो. या पाचही वर्षांचा परतावा म्हणून महत्वाचा ठरतो. नंतर योजनेचा खर्च (Expense Ratio) हा महत्वाच घटक आहे.  मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची भरपाई  गुंतवणूकदारांकडून या रूपातच योजनेच्या  व्यवस्थापनाचा खर्च ठरत
असतो. हा खर्च वाढला तर अर्थातच गुंतवणुकीचे मूल्य (एनएव्ही) कमी होते. या खर्चात व्यवस्थापन शुल्क, खरेदी-विक्रीचा खर्च व विपणन व विक्री खर्चाचा समावेश होतो. योजनेचा खर्च जितका कमी तितका परतावा चांगला असतो.

या पुढचा निकष असतो जोखीम व्यवस्थापन. केवळ सांख्यिकीच्या आधारे बाजारातील चढ-उताराचे मापन (standard deviation) करण्यापेक्षा, ज्या काळात मोठी घसरण होते त्या काळात फंडाची जोखीम व्यवस्थापनाची कसोटी लागते, असे आम्ही मानतो.
इतपत संशोधन झाल्यावर प्रत्येक फंड गटात पहिल्या दहा योजनांचे खालील गोष्टीवर मूल्यमापन केले जाते.
* तेजीत व मंदीत गुंतवणूक करण्याची पद्धती
* पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायांची टक्केवारी, त्यानुसार समभागांची निवड आणि टक्केवारी  
* निधी व्यवस्थापकाची मागील कामगिरी
स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांची शिफारस कशी करता?
रेणू पोथेन: स्थिर उत्पन्न योजनांसाठी आमच्या शिफारशींचे हेच निकष आहेत. त्या शिवाय
* गुंतवणुकीचा पत दर्जा
* रोख्यांची सरासरी मुदत
* पोर्टफोलिओचे मॉडिफॉइड डय़ुरेशन
हे अधिकचे निकष वापरले जातात.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल ?
रेणू पोथेन: माझा गुंतवणूकदारांना असा सल्ला आहे की, सर्वप्रथम तुमची जोखीम सहन करण्याची क्षमता समजून घ्या. आपल्या जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार म्युच्युअल फंड योजनांची निवड करा. कधीही बाजारात चढ-उताराच्या अपेक्षेने गुंतवणूक करू नका. गुंतवणूकदार लहान असो अथवा मोठा दोहोंसाठी नियमित व टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा शिरस्ता अर्थात ‘एसआयपी’ हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

‘फंडस् सुपरमार्ट डॉट कॉम’च्या संशोधन प्रमुख रेणू पोथेन यांनी  kIndian Stock Market: A Real Economy Perspectivel या शीर्षकाचा प्रबंध त्यांच्या पी.एचडी.च्या संशोधनासाठी सादर केला होता. त्या आयआयएम अहमदाबाद येथे अर्थशास्त्र या विद्याशाखेत संशोधन करीत होत्या. अर्थशास्त्रीय संकेतांवर आधारीत गुंतवणूक हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2014 6:59 am

Web Title: investment doctor
Next Stories
1 सेवानिवृत्तीपूर्व नियोजन
2 सहकारी बँकेने दिलेला लाभांश करपात्रच!
3 वाचक प्रश्न
Just Now!
X