13 July 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : आमचं खरंच ठरलंय!

सरलेल्या सप्ताहात शुक्रवारी दिवसांतर्गत सेन्सेक्सवर ४०,७४६ चा नवीन उच्चांक नोंदवून गुतंवणूकदारांना सुखद धक्का दिला

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर कितीही निराशाजनक बातम्या आल्या तरी आम्ही नवीन उच्चांक मारणारच आणि तसं ‘आमचं ठरलंच आहे’ असा एकूण आविर्भाव निर्देशांकाच्या सरलेल्या सप्ताहातील वाटचालीचा होता. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स  – ४०,३२३.६१

निफ्टी – ११,९०८.२०

सरलेल्या सप्ताहात शुक्रवारी दिवसांतर्गत सेन्सेक्सवर ४०,७४६ चा नवीन उच्चांक नोंदवून गुतंवणूकदारांना सुखद धक्का दिला. येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्स ४०,००० आणि निफ्टी ११,९००च्या खाली सातत्याने टिकल्यास तेजीच्या वातावरणातील एक क्षीण स्वरूपाची घसरण सेन्सेक्सवर ३९,४०० आणि निफ्टीवर ११,७५० पर्यंत अपेक्षित असून या स्तरावर पायाभरणी होऊन भविष्यात सेन्सेक्स ४१,००० आणि निफ्टीवर १२,१५० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालेल.

आगामी तिमाही निकालांचा वेध ..

१) ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड

*  तिमाही निकालाची तारीख – सोमवार, ११ नोव्हेंबर

*  ८ नोव्हेंबरचा बंद भाव – ३,१५८ रु.

*  निकालानंतरचा महत्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,१०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,२५० रुपये. भविष्यात ३,१०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास प्रथम ३,४०० व त्यानंतर ३,६५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ३,१००  ते ३,२५० रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ३,१०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,८०० रुपयांपर्यंत घसरण

२) कोल इंडिया लिमिटेड

*  तिमाही निकालाची तारीख – सोमवार, ११ नोव्हेंबर

*  ८ नोव्हेंबरचा बंद भाव – २०९.२५ रु.

*  निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २२५ रुपये. भविष्यात २०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : २०० ते २२५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : २०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १७५ रुपयांपर्यंत घसरण

३) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

*  तिमाही निकालाची तारीख – सोमवार, ११ नोव्हेंबर

*  ८ नोव्हेंबरचा बंद भाव – २०२.८५ रु.

*  निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १९० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २१५ रुपये. भविष्यात १९० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १९० ते २१५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १९० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १७० रुपयांपर्यंत घसरण

४) एबीबी लिमिटेड

*  तिमाही निकालाची तारीख- बुधवार, १३ नोव्हेंबर

*  ८ नोव्हेंबरचा बंद भाव – १,४६२.७० रु.

*  निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५५० रुपये. भविष्यात १,४०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,७०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १,४०० ते १,५५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १,४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,३०० व त्यानंतर १,२०० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2019 4:10 am

Web Title: market index bright share market trends senesex nifty abn 97 2
Next Stories
1 नावात काय? : प्रादेशिक समग्र आर्थिक भागीदारी (आरसेप)
2 कर बोध : तोटा आणि प्राप्तिकर कायदा
3 माझा पोर्टफोलियो : दुर्लक्षित ‘हाय-बीटा’ शिलेदार
Just Now!
X