tax121आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
‘कलम ५४’ प्रमाणे नवीन घरामध्ये गुंतवणूक फक्त भारतातच करता येते!
प्रश्न: माझे वय ७० वर्ष आहे. माझे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. माझा मुलगा अमेरिकेत राहतो. तो अनिवासी भारतीय आहे. माझा मुलगा मला घर खर्चासाठी अमेरिकेतून पसे पाठवतो. ते मी माझ्या बचत खात्यात जमा करतो. या रकमेवर मला कर भरावा लागेल का?
– रमेश दाणी
उत्तर: भारतामध्ये मिळालेल्या उत्पन्नावर भारतात कर भरावा लागतो. आपल्या मुलाने घर खर्चासाठी दिलेले पसे आपले उत्पन्न होत नाही. त्यामुळे या उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : माझे वडील एलआयसी एजंट होते. त्यांचे डिसेंबर २०१० मध्ये निधन झाले. त्यांच्या नावे असणारे कमिशन माझ्या आईच्या नावावर येते. मी आíथक वर्ष २०१०-११ आणि २०११-१२ वर्षांसाठीचे वडिलांचे विवरण पत्र दाखल केले. त्यामध्ये कर परतावा (रिफंड) दाखविला होता. वडिलांचे बँक खाते बंद केल्यामुळे हा परतावा परत गेला. हा कर परतावा कसा मिळू शकेल? आणि या पुढचे विवरण पत्र कसे दाखल करावे?  
– गणेश पवाडे
उत्तर: मृत व्यक्तीचे विवरण पत्र हे वारसदाराला दाखल करावे लागते. मृत व्यक्तीच्या विवरण पत्रामध्ये मृत्युच्या दिवसापर्यंतच्या उत्पन्नाचा समावेश होतो. त्याच्या मृत्यू नंतर मिळणारे उत्पन्न हे वारसदाराचे उत्पन्न असते. आपण आपल्या वडिलांचे विवरण पत्र हे डिसेंबर २०१० पर्यंतचे उत्पन्न विचारात घेऊन भरणे आवश्यक होते. डिसेंबर २०१० नंतरचे उत्पन्न हे आपल्या आईच्या (वारसदाराच्या) नावाने दाखवून आईच्या नावाने विवरण पत्र भरावयास हवे होते. म्हणजेच आíथक वर्ष २०१०-११ साठी वडिलांच्या नावाने एक विवरण पत्र (डिसेंबर २०१० पर्यंतचे उत्पन्न दाखवून) आणि याच वर्षांसाठी आईच्या नावाने एक विवरण पत्र ज्यात डिसेंबर २०१० नंतरचे उत्पन्न दाखविले पाहिजे. आणि २०११-१२ आणि त्यानंतरचे विवरण पत्र हे आईच्या नावाने भरले पाहिजे. जर कर परतावा (रिफंड) बँक खाते बंद केल्यामुळे खात्यात जमा होऊ शकला नाही तर प्राप्तीकर अधिकाऱ्याला पत्र लिहून किंवा विवरण पत्र संगणकाद्वारे दाखल केले असेल तर ONLINE REFUND RE-ISSUE REQUEST दाखल करू शकता. त्या पूर्वी मृत व्यक्तीच्या प्राप्तीकर खात्याच्या ढअठ च्या संकेतस्थळावर वारसदार म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे.

प्रश्न: माझे वडील भारतात राहतात आणि मी अमेरिकेत राहतो. माझ्या वडिलांच्या नावाने दोन घरे आहेत. एक घर विकून दुसऱ्या घरात पसे गुंतविले तर झालेल्या नफ्यावर कर भरावा लागत नाही. जर हे नवीन घर अमेरिकेत असेल तर करातून सूट मिळेल का? हे पसे मला ते भेट रूपात देऊ शकतात का?
–  राकेश (ईमेलवर प्राप्त)
उत्तर: एक घर विकून दुसऱ्या घरात गुंतवणूक केल्यास झालेल्या नफ्यावर कर सवलत मिळते. हे घर भारतातच असावे अशी तरतूद कलम ५४ किंवा कलम ‘५४ एफ’मध्ये नव्हती. त्यामुळे घर जरी भारताबाहेर घेतले तरी कलम ५४ खाली सूट मिळत होती. परंतु २०१४ च्या अर्थसंकल्पात या कलमामध्ये झालेल्या बदलानुसार १ एप्रिल २०१४ नंतर एक घर विकून दुसऱ्या घरात गुंतवणूक केल्यास झालेल्या नफ्यावर कर सवलत मिळते पण हे नवीन घर भारतातच असले पाहिजे, अशी अट या कलमामध्ये असल्यामुळे या तारखेनंतर भारताबाहेर घेतलेल्या घरावर भारतात कर सवलत मिळणार नाही. घर विक्रीतून मिळालेले पसे भारतात कर भरून भारताबाहेर भेट म्हणून पाठवता येतात. तेही एका आíथक वर्षांत मर्यादित रक्कम पाठविता येते.

प्रश्न: माझे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मला संगणकाद्वारे विवरण पत्र भरावयाचे आहे. यासाठी मला काय करावे लागेल?
– एक वाचक
उत्तर: प्रथम आपल्याला प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागेल. यासाठी आपला पॅन, नाव, पत्ता, जन्म तारीख, भ्रमणध्वनी, ईमेल, इत्यादी माहीत भरावी लागेल. ही माहिती  पॅन मिळविताना भरलेल्या अर्जातील माहितीशी तंतोतंत जुळली पाहिजे. ही माहिती भरल्यानंतर आणि ती प्राप्तिकर खात्यावरील माहितीशी जुळल्यानंतर आपल्याला भ्रमणध्वनी आणि ईमेल वर एक क्रमांक आणि पासवर्ड मिळेल, तो मिळाल्यानंतर आपल्याला लॉग-इन करता येईल. विवरण पत्र हे प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून भरावे लागेल. भरून पूर्ण झाल्यावर  XML फाईल तयार करावी लागेल आणि ही फाईल विवरण पत्राचा क्रमांक निवडून अपलोड करावी लागेल. जर विवरण पत्र बरोबर असेल तर ITR V  हा लगेच तयार होतो. या ITR V  ची प्रिंट काढून त्याची प्रत स्वाक्षरी करून बंगळुरूला येथे १२० दिवसांमध्ये पाठवावी लागेल. ही प्रत बंगळुरूला पोहोचल्याची पावती आपल्या भ्रमणध्वनी आणि ईमेल वर येते. ही पावती आल्यानंतर आपले विवरण पत्र दाखल झाले असे समजावे.

प्रश्न: मी ज्या कंपनीत नोकरी करतो, ती कंपनी मला घरभाडे भत्ता देते. मी भरलेल्या भाडय़ाचे विवरण कंपनीला देऊ शकलो नाही त्यामुळे कंपनीने घरभाडे भत्त्यावर सुद्धा उद्गम कर (टीडीएस) कापला आणि त्या तपशिलासह मला फॉर्म १६ दिला. मला घरभाडे भत्त्यावर झालेली टीडीएस कपात परत मिळविता येऊ शकते का?
–  एक वाचक
उत्तर: घरभाडे भत्त्याची वजावट जरी कंपनीने गणली नसली तरी विवरण पत्रात कलम १० (१३) प्रमाणे घरभाडे भत्त्याची वजावट घेऊन प्राप्तीकर खात्याकडून कर परतावा मागू शकता. यासाठी विवरण पत्र भरावे लागेल. जर आपण विवरण पत्र मुदतीपूर्वी दाखल केले असेल तर सुधारित विवरण पत्र दाखल करता येईल.

प्रश्न : मी आíथक वर्ष 2013-14 चे विवरण पत्र देय कर न भरता दाखल केले आहे. याचे परिणाम काय होऊ शकतात.
–  एक वाचक
उत्तर: कलम १४०अ प्रमाणे स्व: निर्धारण कर (SELF ASSESSMENT TAX) आणि व्याज हे विवरण पत्र भरताना किंवा त्यापूर्वी भरणे गरजेचे असते. हा कर भरल्याशिवाय जर विवरण पत्र भरले तर ते अपूर्ण समजले जाते.

प्रश्न: मी माझ्या आईला १० लाख रुपये भेट दिले आहेत. आईने हे पसे बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आहेत त्यावर तिला ९०,००० रुपये व्याज मिळते. हे व्याज माझ्या उत्पन्नात गणले जाईल का?
–  एक वाचक
उत्तर: हे व्याज आपल्या उत्पन्नात गणले जाणार नाही.

प्रश्न: मी एक अनिवासी भारतीय आहे. मला भारतात घरामध्ये गुंतवणूक करावयाची आहे. त्यासाठी प्राप्तीकर कायद्यात काय तरतुदी आहेत?
–  एक वाचक
उत्तर: अनिवासी भारतीय भारतात घरामध्ये गुंतवणूक करू शकतात. यासाठी कोणत्याही तरतुदी प्राप्तीकर कायद्यात नाहीत. परंतु जर घर विक्री केली तर त्यावर कर भरावा लागतो. हे पसे परत भारताबाहेर पाठवयाचे असतील तर कर भरून पाठवू शकता. त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते.  

प्रश्न: माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावाने एक व्यावसायिक गाळा आहे. या गाळ्यात माझा आणि पत्नीचा हिस्सा बरोबरीचा आहे. आम्ही तो एका कंपनीला भाड्याने देऊ इच्छितो. या गाळ्याचे भाडे मासिक ५०,००० रुपये इतके आहे. आम्ही प्रत्येकाच्या नावे २५,००० रुपये इतका धनादेश दरमहा कंपनीकडून घेऊ शकतो का? याचे करपात्र उत्पन्न कसे गणले जाईल?
– एक वाचक
उत्तर : आपण कंपनी बरोबर भाडे करार करतांना आपल्या संयुक्तिक मालकी हक्काबाबतचा तपशील द्यावा आणि हे भाडे विभागून देण्याची तरतूद करारामध्ये करावी म्हणजे कंपनी भाडे देतांना त्यावरील ळऊर हा प्रत्येकाच्या नावाने वेगळा भरेल. आपले उत्पन्न गणतांना आपल्या वाट्याची भाड्याची रक्कम आणि ळऊर घ्यावा. इतर वजावटी जसे मालमत्ता कर, व्याज आणि प्रमाणित वजावट ही आपल्या हिस्स्या प्रमाणे घेता येईल.