News Flash

बाजाराचा तंत्र-कल : तेजीची झुळूक

गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊ या.

आशीष ठाकूर

सेन्सेक्सवर ४७,५०० आणि निफ्टीवर १४,२०० चा स्तर सातत्याने राखल्यास निर्देशांकावर मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक अपेक्षित आहे. मागील लेखात नमूद हे वाक्य आपण सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी अनुभवले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४८,७८२.३६

निफ्टी : १४,६३१.१०

या स्तंभातील गेल्या महिन्याभरातील प्रत्येक लेखातील महत्त्वाचे वाक्य होते.. तेजीच्या दृष्टीने निर्देशांकांनी – म्हणजे सेन्सेक्सने ५०,००० च्या वर आणि निफ्टी १५,००० या महत्त्वाचा केंद्रबिंदू / वळणबिंदू स्तरावर टिकणे नितांत गरजेचे आहे. हाच स्तर भविष्यातील निर्देशांकाच्या वाटचालीतील वळणबिंदू असेल. वरील वाक्य निर्देशांकांनी सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी आणि शुक्रवारी आपल्या वाटचालीतून अधोरेखित केले. ही वाटचाल इतकी अचूक होती की, गुरुवारी सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० च्या स्तराला स्पर्श झाला,

पण शुक्रवारी निर्देशांकावर दातखिळी बसवणारी घसरण झाली. आता हाच स्तर डोळ्यासमोर ठेवून तीन पर्यायांबरोबरच या स्तंभातून विकसित केलेल्या आणि पुढे काळाच्या कसोटीवर उतरलेल्या अशा गणिती कोष्टकांचा आधार घेत निर्देशांकाच्या भविष्यातील वाटचालीचा विचार करू या.

या स्तंभातून विकसित केल्या गेलेल्या निफ्टीवरील १,००० ते १,१५० अंशांच्या तेजी-मंदी चक्राचा आधार घेता..

* पहिला पर्याय :

भविष्यात, सेन्सेक्स ५०,००० वर आणि निफ्टी निर्देशांक १५,००० या स्तरावर सातत्याने टिकल्यास,  सेन्सेक्स ५४,५०० आणि निफ्टी १६,००० च्या ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घालताना दिसतील.

* दुसरा पर्याय :

गेल्या वर्षभरात निर्देशांक नीचांकापासून दुप्पट झाल्याने ही भूमिती श्रेणीतील वाढ सामावून घेण्यासाठी किमान ३३ टक्के कालावधी मे ते जून महिन्यापर्यंत निर्देशांकासाठी विश्रांतीचा असेल. (संदर्भ : या स्तंभातील १२ एप्रिलच्या ‘कालाय तस्मै नम:’ लेख) निर्देशांक म्हणजेच, सेन्सेक्स ५०,००० आणि निफ्टी १५,००० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४८,०५० आणि निफ्टीवर १४,४०० द्वितीय लक्ष्य सेन्सेक्सवर ४७,८५० आणि निफ्टीवर १४,००० असे असेल.

तिसरा पर्याय :

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते करोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता ही मे-जूनपर्यंत कायम असेल. जी आपल्या निर्देशांकाच्या विश्रांतीच्या किमान कालवधीशी साधम्र्य सांगणारी आहे. अशा ‘स्थितीत निर्देशांकावरची मंदीची दाहकता ही सेन्सेक्सवर ४७,१०० आणि निफ्टीवर १३,८०० अशी असेल.

येणाऱ्या दिवसातील अगदी अल्प मुदतीत निर्देशांकांनी आता चालू असलेल्या घसरणीत, सेन्सेक्सवर ४८,०५० आणि निफ्टीवर १४,४०० चा स्तर सातत्याने राखल्यास पुन्हा मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक अपेक्षित आहे. जिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४९,७०० ते ५१,४०० आणि निफ्टीवर १४,९०० ते १५,२०० असे असेल.

या मंदीच्या रेटय़ात सेन्सेक्सवर ४८,०५० आणि निफ्टीवर  १४,४०० चा स्तर राखण्यात निर्देशांक अपयशी ठरल्यास, सेन्सेक्सवर ४७,८५० ते ४७,१०० आणि निफ्टीवर १४,००० ते १३,८०० पर्यंत घसरण दिसू शकते.

निकालपूर्व विश्लेषण..

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊ या.

१) कोटक महिंद्र बँक

’  तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, ३ मे

’  ३० एप्रिलचा बंद भाव – १,७४८.६० रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर                 – १,८५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,८५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,९५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,०५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,८५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,६०० रुपयांपर्यंत घसरण.

२) टाटा केमिकल्स लिमिटेड

’  तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, ३ मे

’  ३० एप्रिलचा बंद भाव – ७९३ रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९३० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०३० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६६० रुपयांपर्यंत घसरण.

३) एचडीएफसी लिमिटेड

’  तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, ७ मे

’  ३० एप्रिलचा बंद भाव – २,४२०.१५ रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर     – २,५५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,६५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,२५० रुपयांपर्यंत घसरण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 4:04 am

Web Title: technical analysis of stocks weekly stock market review zws 70
Next Stories
1 रपेट बाजाराची : वार्षिक निकाल पर्व..
2 क..कमॉडिटीचा : खरिपाचे नियोजन आणि विक्री.. एकाच वेळी
3 फंडाचा ‘फंडा’.. :  वित्तीय मार्गदर्शक असण्याचे फायदे!
Just Now!
X