व्हॅल्यू इन्व्हेस्टरआजच्या सारख्या संधीच्या शोधात असतो. आज बाजारात अशा अनेक बँका उपलब्ध आहेत, ज्यांचे डिव्हिडंड यील्ड बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाहून अधिक आहे. अशा संधींचे सोने करण्यासाठी धाडस दाखवून बॉटम फििशगकरण्याची तयारी हवी.

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला.

‘राजा! बाजार गडगडलेला असताना तू इतका आनंदी कसा राहू शकतोस?’ वेताळाने विचारले.

‘तू जेने गुडेनफ हे नाव ऐकले आहेस का?’ राजाने हसत वेताळाला प्रतिप्रश्न केला.

‘मागील आठवडय़ापासून हे नाव बॉलीवूड न्यूजमध्ये आहे’, राजानेच उत्तर दिले. ‘हा माणूस डिम्पल गर्ल अर्थात प्रीती िझटाचा बॉय फ्रेण्ड असून ती दोघे व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारा जेने व्यवसायाने ‘इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्ट’ असून प्रीतीचा बॉयफ्रेण्ड बनण्याआधी तो तिचा गुंतवणूक सल्लागार होता. प्रीतीची व जेनेची पहिली ओळख अमेरिकेत झाली. त्याने प्रीतीला दिलेल्या गुंतवणूकविषयक सल्ल्यामुळे प्रीती त्याच्या बुद्धिकौशल्यावर प्रभावित झाली. आयपीएल २०१५ च्या मोसमात ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’चा उत्साह वाढविण्यासाठी या ‘किंग’ला खास तिने निमंत्रित केले होते. आपल्या इथले मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागारही आपल्या अशिलांच्या यादीतील एखाद्या ‘प्रीती’चा शोध घेऊ लागले आहेत. ‘इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्ट’शी अशिलाचे नाते ‘अ रिलेशनशिप बियॉण्ड इन्व्हेस्टमेंट्स’ हेच खरे. मी आनंदी दिसण्याचे हेच कारण आहे,’’ राजा हसत म्हणाला.

जगातील सर्वात श्रेष्ठ ‘इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्ट’ वॉरेन बफे म्हणतात – ‘‘if there is a bargain in buying stocks that have been hammered down’’ आज मला बफे सरांच्या या वाक्याची सारखी आठवण होत आहे. मागील १२ महिन्यांत सरकारी बँकांच्या किमती सरासरी ५०% ने घटल्या आहेत. आज सरकारी बँकांच्या गुंतवणुकीत बफेंच्या भाषेत सांगायचे तर मोठी ‘intrinsic value’ दडलेली आहे. बहुतांश सरकारी बँकांची ५१% हून अधिक मालकी सरकारकडे आहे. मालकांचे झालेले दुर्लक्ष व व्यवस्थापकांनी केलेला कामचुकारपणा याचे परिणाम समभाग गुंतवणुकदार भोगत आहेत. आíथक उदारीकरणानंतर सरकारने १९९१ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग व्यवसायाचे नियमन करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीमुळे भारतीयांचा ‘नॉनपरफॉर्मिग अ‍ॅसेट्स- एनपीए’ या शब्दाशी परिचय झाला. १९९८ मध्ये दुसऱ्यांदा नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमली. १९९८-२००२ दरम्यान बँकांची १३% कर्जे अनुत्पादित झाली होती. सरकारने आपली मालकी ५१% हून कमी न होण्यासाठी त्या वेळी बँकांना भांडवल दिले. सुधारलेल्या अर्थव्यवस्थेमुळे ‘एनपीए’  लवकरच ‘परफॉìमग अ‍ॅसेट’ बनल्या. यानंतर २००३-२००७ दरम्यान आलेल्या तेजीत गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा बँकिंग क्षेत्राने दिला. आठवा ते दिवस, स्टेट बँकेच्या दहा रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरने ११ नोव्हेंबर २००७ रोजी ३५१५ रुपये हा आपला सार्वकालिक उच्चांकी भाव नोंदवला. याच दरम्यान बँक ऑफ बडोदाचा सार्वकालिक उच्चांक होता १०५० रुपये होता. अलीकडे वाढत्या ‘एनपीए’मुळे नफ्यातून करावी लागणारी तरतूद वाढल्याने बँकांची नफाक्षमता कमी झाली आहे. असे समजा की, बँका आज १०० रुपये व्यवसायासाठी वापरत आहेत यापकी १२ रुपये (कॅपिटल अ‍ॅडेक्वेसी १२ टक्के बंधनकारक असल्याने) सरकार व अन्य समभागधारकांचे असून उर्वरित ८८ रुपये ठेवीदारांचे असतात. त्यामुळे बँकेचे लीव्हरेज (१०० भागिले १२) ८.३ आहे. साहजिकच जेव्हा अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढते तेव्हा मालकांना नवीन भांडवल ओतावे लागते. सरकारी बँकांच्या तीन लाख कोटींच्या अनुत्पादित कर्जामुळे (एनपीए) सरकार बँकांना ४० हजार कोटींचे अतिरिक्त भागभांडवल देऊन त्यांची भांडवली पूर्तता (कॅपिटलायझेशन) करणार आहे. व्यवसायाचे स्वरूप असे असल्याने बँकांनासुद्धा घसघशीत लाभांशाच्या रूपाने समभागधारकांना परतावा द्यावा लागतो. मागील वर्षी स्टेट बँकेने ३५०% लाभांश व त्याआधीच्या वर्षी ४००% लाभांश जाहीर करून भागधारकांना व विशेषत: सर्वात मोठा भागधारक म्हणून सरकारला परतावा दिला होता. स्टेट बँकेने प्रीफरन्स इश्यूची किंमत २७४.३७ रु. निश्चित केली होती. नादारी व दिवाळखोरी कायद्याने निर्ढावलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विक्री करणे बँकांना शक्य होणार आहे. लवकरच बँकांना निर्ढावलेल्या कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेणे शक्य होईल. ‘ज्या वेळेला जग विकत असते तेव्हा खरेदीची उत्तम संधी असते’, असे बफे यांचे म्हणणे आहे. त्याला बफे Bargain Hunting असे म्हणतात. कोणाला सरकारी बँका या गुंतवणूकदारांसाठी सापळे (Value Trap) ठरण्याचीही शक्यता वाटते. जेव्हा क्रूड ऑइलचा भाव १४० रु. होता तेव्हा तेल वितरण कंपन्यांच्या समभागात अशीच संधी दडली होती. या तेल वितरण कंपन्यांच्या शेअर्सचा आजचा आणि २०१२-१३ चा भाव बघ. बफे यांच्यासारखा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ अशाच संधीच्या शोधात असतो. ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ या गोष्टीवर विश्वास असणाऱ्या एका मोठय़ा गुंतवणूकदाराने बँकेतील भांडवल ५% हून अधिक वाढविले आहे, असे जम्मू काश्मीर बँकेने शेअर बाजारांना कळविले आहे. आज बाजारात अशा अनेक बँका उपलब्ध आहेत, ज्यांचे डिव्हिडंड यील्ड बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाहून अधिक आहे. अशा संधींचे सोने करण्यासाठी धाडस दाखवून ‘बॉटम फििशग’ करण्याची तयारी हवी,’ राजा म्हणाला.

अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

gajrachipungi@gmail.com