News Flash

इच्छापत्र: समज-गैरसमज ३: इच्छापत्रांचे विविध प्रकार

या मासिक लेखमालेतून इच्छापत्रातले प्रकार या बद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयास आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| डॉ. मेधा शेटय़े

या मासिक लेखमालेतून इच्छापत्रातले प्रकार या बद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयास आहे. इच्छापत्राचे अनेक प्रकार आहेत. त्याची माहिती करून घेऊया.

  • होलोग्राफ विल – मागील लेखात म्हटल्याप्रमाणे इच्छापत्र बनवण्याकरिता काही काटेकोर नियम नाहीत व कोणत्याही भाषेचे र्निबंधही नाहीत. त्याच प्रमाणे तुम्ही, ते जर का आपल्या सुवाच्च अक्षरात मांडले असेल तर अशा इच्छापत्राला होलोग्राफ विल असे संबोधले जाते.
  • इन ऑफिशियस विल – एखादी व्यक्ती त्याची संपत्ती नतिक कर्तव्याविरूद्ध अनोळखी व्यक्तीला देऊ करते, म्हणजेच नाते संबंधांव्यतिरिक्त इसमाला/इसमांना देते अशा मृत्युपत्राला इनऑफिशियस विल असे म्हणतात.
  • जॉईन्ट विल – हे नावच आपल्याला बरेचशी माहिती देऊन जाते नाही का? तुम्ही जे जाणले आहे ते अगदी बरोबर. शब्दश: अर्थाप्रमाणे, जर एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन आपल्या मालमत्तेचे विभाजन एकाच इच्छापत्रात नमूद करतात अशा दस्ताऐवजाला जॉईंट विल असे म्हणतात.
  • कंडिशन विल – नावाप्रमाणे या दस्ताऐवजात इच्छापत्र करणारी व्यक्ती एखादी अट नमूद करते, ही अट स्वत: इच्छापत्र करणाऱ्या पुरतीच मर्यादित असते. उदाहरणार्थ मी यात्रेहून परत न आल्यास या दस्ताऐवजाला इच्छापत्र समजा. ती अट पूर्ण न झाल्यास दस्ताऐवज अवैध ठरतो.

याचप्रमाणे इच्छापत्र तयार करणारा देणगी दिलेल्या व्यक्तीवर अट लागू करू शकतो त्याला कंडिशन बिक्वेथ असे म्हणतात. ही अट वारसाला त्याचे अधिकार, इच्छापत्राद्वारे फायदा प्रदान करण्याआधी किंवा इच्छाप्रत्रात नमूद केलेल्या व्यक्तीला स्वारस्य देण्याआधी पूर्ण करणे बंधनकारक असते. ही अट नमूद करते वेळी इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने ही अट कायद्याला अनुसरून आहे हे पाहणे आवश्यक आहे. नमूद केलेली अट कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारी नसावी हे महत्वाचे.

  • प्रीव्हलेज्ड विल – हा दस्तऐवज नावाप्रमाणे काही प्रीव्हलेज्ड (ठरावीक)व्यक्तिनाच करता येतो. कोणत्याही दलातल्या सनिकाला हे विशेषाधिकार (प्रीव्हलेज) दिलेले आहेत. अशी व्यक्ती हे इच्छापत्र युध्दावस्थेत किंवा मोहिमेवर असताना करू शकते. या सूचना लेखी किंवा तोंडीदेखील देता येतात. तोंडी केलेले इच्छापत्र एका महिन्यापर्यंत लागू राहते. त्यानंतर इच्छापत्र करणारी व्यक्ती मोहिमेत वा युध्दात जिवित राहीली तर ते अवैध ठरते.
  • अनप्रीव्हलेज्ड विल – कोणत्याही इसमाने नियमानुसार लेखी केलेले इच्छापत्र हे अनप्रीव्हलेज्ड विल होय.

एकदा केलेले इच्छापत्र बदलता येते का?

इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीला इच्छापत्र पूर्णत: न बदलता थोडेफार बदल करायचे असतील तर त्याकरिता कोडीसिल नामक दस्तऐवज करता येते. हा दस्तऐवज इच्छापत्राची पुरवणी या स्वरूपाचा असतो. ही दुरुस्ती तुम्ही तुमच्या हयातीत कितीही वेळा करू शकता. तसेच तुम्हाला जर इच्छापत्र बदलावेसे वाटल्यास, ते देखील करू शकतात. इच्छापत्र किती करावीत याला काही नियम नाही. परंतु नवीन केल्यास पूर्वीचे इच्छापत्र अवैध ठरते. अधिक तपशील पुढच्या लेखात.

(लेखिका कायदाविषयक तज्ज्ञ)

(या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 3:33 am

Web Title: what is will part 3
Next Stories
1 सोने एक ‘वंडर कमोडिटी’ भाग तिसरा
2 तेजीची झुळूक की शाश्वत तेजी?
3 नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नांव..
Just Now!
X