फंडाविषयक विवरण
फंड प्रकार    :    समभाग गुंतवणूक असलेला फंड
जोखीम प्रकार     :    समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक    :    हा फंड  १०० टक्के गुंतवणूक समभागात व अल्प गुंतवणूक रोकड सममूल्य असलेल्या अल्प मुदतीच्या रोख्यात करणारा फंड आहे. एस अँड पी बीएसई ५०० निर्देशांक हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून वर्षांआत बाहेर पडल्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू.
फंड गंगाजळी    :     फंडाची मालमत्ता ६९० कोटी रु. ३०/०६/२०१५ रोजी
व्यवस्थापन    :    असून या आधी ते शेअरखान व कोटक सिक्युरीटीज या दलाली पेढय़ांत व कोटक म्युच्युअल फंडात कार्यरत होते
पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती    :    फंडाच्या www religareinvesco.com वेबस्थळावरून किंवा RCF हा एसएमएस 9969703647 या क्रमांकावर पाठवावा. किमान पाच हजार एका वेळेस किंवा अथवा किमान एक हजाराच्या एसआयपीने या फंडात गुंतवणूक करता येते.
काँट्रा हे Contrarian या इंग्रजी शब्दाचे लघुरूप आहे. याचा अर्थ परस्पर विरोधी. शेअर बाजाराचा तत्कालीन कल लक्षात घेऊन बाजारात दुर्लक्षित राहिलेल्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड म्हणजे काँट्रा फंड. बाजारातील  सर्व सूचिबद्ध कंपन्या चौदा पंधरा उद्योग क्षेत्रात विभागलेल्या आहेत. या सर्वच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना नेहमीच गुंतवणूकदारांची पसंती नसते. गुंतवणूकदारांची पसंती नसलेल्या उद्योग क्षेत्रातील कंपन्या निवडून त्यात गुंतवणूक करणे हे या फंडांचे धोरण आहे. उदाहरण द्यायचे तर सोळाव्या लोकसभेचे निकाल लागले तेव्हा रुपया डॉलरचा विनिमय दर ५८ पर्यंत वधारला होता. अशा वेळी काँट्रा फंडांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली. आज दीड वर्षांनतर रुपयाची घसरण होत असताना ही गुंतवणूक फायद्याची ठरली आहे. या फंडापकी बहुतांश फंड ‘इक्विटी डायव्हर्सिफाइड’ या प्रकारात मोडणारे फंड आहेत. या फंडाच्या एका वर्षांहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीवरील भांडवली नफा अन्य समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाप्रमाणे करमुक्त असून एक वर्षांहून कमी कालावधीच्या नफ्यावर १५% कर भरावा लागतो. या प्रकारचे फंड दरवर्षी परतावा देतातच असे नाही. पण दोन-तीन वर्षांत एखाद्या वेळी मिळणारा नफा मागील दोन तीन वर्षांची कसर भरून काढतो. आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील एक अल्पसा हिस्सा या फंडात गुंतविण्यास काहीच हरकत नाही. हा फंड कायमच ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ या प्रकारच्या गुंतवणुकीची तत्त्वे अवलंबिणारा फंड आहे. या फंडांच्या लिखित स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा फंड एकूण गुंतवणुकीपकी ४० टक्के गुंतवणूक ‘व्हँल्यू इन्व्हेस्टमेंट’ प्रकारात करतो. याचा परिणाम फंडाचा पी/ई हा निर्देशांकाच्या पी/ईपेक्षा कमी असतो. याच फंड घराण्याच्या ग्रोथ फंडाच्या पी/ईपेक्षा किमान २०-२५ टक्के कमी असतो. यामुळे हा फंड एक अव्वल ‘व्हँल्यू फंड’ प्रकारात मोडणारी गुंतवणूक ठरतो. फार धोका न पत्करता स्थिर उत्पन्न देणाऱ्या फंडांपेक्षा अधिक परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी एका वर्षांहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीसाठी या फंडाचा जरूर विचार करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religare invesco contra fund
First published on: 26-10-2015 at 01:01 IST