कंपनीचे उद्दिष्ट २०२० पर्यंत ३,००० कोटी रुपयांची उलाढाल पार करण्याचे आहे. अर्थात, हे उद्दिष्ट कठीण वाटत असले तरीही परदेशात किंवा भारतात काही कंपन्या ताब्यात घऊन, कार्यक्षेत्रात विस्ताराचे नियोजित उद्दिष्ट अमलात आल्यास हे शक्य आहे.

वर्ष १९८९ मध्ये स्थापन झालेली टाटा एलेक्सी ही सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील टाटा समूहाची कंपनी गुंतवणूकदारांना नवीन नाही. कंपनी मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन तसेच वाहन क्षेत्रात इंजिनीयरिंग सेवा पुरविते. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठीदेखील कंपनी डिजिटल कन्टेंट पुरविते.

बंगळूरुयेथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची भारतामध्ये मुंबई, पुणे, चेन्नई तसेच थिरुअनंतपुरम येथे सेवा केंद्रे असून परदेशातही म्हणजे दुबई, फ्रान्स, जर्मनी, जपान, यूके, आर्यलड तसेच अमेरिका येथे कार्यालये आहेत. गेल्या आर्थिक वर्षांकरिता १,०६७ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या कंपनीचे उद्दिष्ट २०२० पर्यंत ३,००० कोटी रुपयांची उलाढाल पार करण्याचे आहे. अर्थात, हे उद्दिष्ट कठीण वाटत असले तरीही परदेशात किंवा भारतात काही कंपन्या ताब्यात घेतल्या तर हे उद्दिष्ट साध्य होऊ  शकेल.

कुठलेही कर्ज नसलेल्या कंपनीचा डिसेंबर २०१६च्या तिमाहीचा निकाल अपेक्षेप्रमाणेच आहे. कंपनीने या तिमाहीत ३०९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४३.८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १० टक्क्यांनी जास्त आहे. अर्थात, इतर कंपन्यांच्या तुलनेत हा शेअर थोडासा महाग वाटत असला तरीही येत्या तीन वर्षांत कंपनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करेल अशी अपेक्षा आहे. सध्या १,५०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दोन-तीन वर्षांत फलदायी ठरू शकेल.

arth02

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला आवश्यक आहे.

अजय वाळिंबे