आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांक १७,००० पातळीवर असताना, अमेरिकेतील महागाई, कर्जावरील वाढते व्याजदर, रशिया- युक्रेन युध्दज्वरामुळे इंधनाचे चढे दर, त्यात चलन विनिमयात कमकुवत रुपयामुळे आयात महाग होत असल्याने अर्थसंकल्पीय तुटीची वाढती समस्या अशा सर्व आर्थिक समस्यांमुळे सर्वजण हवालदिल होते. हे सर्व निराशाजनक धक्क्यांची दाहकता, तीव्रता मोजण्यासाठी आपल्या इथे आपण निफ्टी निर्देशांकावर १७,००० चा स्तर विकसित केलेला ज्याचा उल्लेख ‘या स्तरावर तेजीची कमान’ आधारलेली असून जोपर्यंत निफ्टी निर्देशांक १७,००० चा स्तर राखत आहे तोपर्यंत गुंतवणूकदार मंदीपासून सुरक्षित आहेत. तर तेजीची परिभाषा विकसित करण्यासाठी..निफ्टी निर्देशांकावर १७,६०० हा महत्त्वाचा केंद्रिबदू असून, भविष्यात निफ्टी निर्देशांकांनी १७,६०० चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १७,९०० ते १८,२०० असेल, जे सरलेल्या सप्ताहातील बुधवारी १८,१७८ चा उच्चांक गाठत, निफ्टी निर्देशांकानी साप्ताहिक बंद १८,००० च्या स्तरावर दिला. परिणामी दोन-तीन महिन्यांपासून मंदीच्या छायेत वावरणाऱ्या समस्त गुंतवणूकदारांवर निफ्टीनी तेजीच चांदणे शिंपित १७,००० ते १८,२०० पर्यंतची वाटचाल करत सर्वाना तेजीच्या शीतल चांदण्यात न्हाऊन काढले. या पार्श्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळू या.    

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Will Nifty reach the difficult stage of 22800 to 23400 in bullish trend
तेजीच्या वाटचालीतील २२,८०० ते २३,४०० हा अवघड टप्पा निफ्टी गाठेल?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स: ६०,९५०.३६

 निफ्टी: १८,११७.१५

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १८,३०० ते १८,६०० असून या स्तरावरून एक हलकीशी घसरण ही निफ्टी निर्देशांकावर १७,८०० ते १७,५०० पर्यंत अपेक्षित असेल. या घसरणीचा उपयोग बाजारात समभागांच्या फेरखरेदीसाठी करावा. या घसरणीत निफ्टी निर्देशांकांनी १७,५०० चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांक १८,९०० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालेल.

करोना महामारीच्या दिवसात ज्या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ज्या क्षेत्राचे रूपडेच पालटले त्या भांडवली क्षेत्रात विविध वित्तीय सेवा पुरवणाऱ्या, संपत्तीच नियोजन करणाऱ्या संस्था. त्या दृष्टीने आजचा आपला शिंपल्यातील मोती हा ‘आनंद राठी वेल्थ लिमिटेड’ असणार आहे. (समभागाचा शुक्रवार दि.४ नोव्हेंबरचा बंद भाव ७१२.२५ रुपये आहे.)  डिसेंबर २१ मध्ये कंपनीची प्रथम भाग भांडवल विक्री होऊन १४ डिसेंबरला ही प्रथम भाग भांडवल विक्री भांडवली बाजारात नोंदणी होऊन समभागाची खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले. दरम्यानच्या बाजाराच्या मंदीत हा समभाग ५४२ रुपयांपर्यंत घसरला आणि त्या नंतरच्या बाजारातील सुधारणेत आनंद राठी वेल्थ लिमिटेडनी १३ एप्रिलला ७२१ रुपयांचा उच्चांक नोंदवला.

दरम्यानच्या काळातील कंपनीची दमदार आर्थिक कामगिरी समभागाच्या बाजार भावावर परावर्तित होत आताच्या घडीला समभाग आपल्या सर्व चलत सरासरींवर (मूव्हिंग अ‍ॅव्हरेज) बाजारभाव आहे. जसे की २० दिवसांची चलत सरासरी ही ६९४ रुपये, ५० दिवसांची चलत सरासरी ६७२ रुपये, १००दिवसांची चलत सरासरी ६६० रुपये, २०० दिवसांची चलत सरासरी ६३५ रुपये आहे. 

कंपनीची आर्थिक कामगिरी दमदार चालू आहे, याचा पुरावा म्हणजे सप्टेंबरच्या तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यावर समभागांनी १३ एप्रिलचा ७२१ रुपयांचा उच्चांक लीलया पार करत १४ ऑक्टोबरला ७३२ रुपयांचा उच्चांक नोंदवला.  दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणूक कालावधी ३ ते ५ वर्षे) हा समभाग आता नजरेसमोर ठेवत बाजारात व समभागात जेव्हा मंदी येईल, तेव्हा हा समभाग ६७० ते ६३५ च्या दरम्यान गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता वीस टक्क्यांच्या पाच तुकडय़ांत दीर्घमुदती करता खरेदी करावा.

निकालपूर्व  विश्लेषण

१)नोसील लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ८ नोव्हेंबर

४ नोव्हेंबरचा बंद भाव – २४४.५० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २४० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २६० रुपये, द्वितीय लक्ष्य २८० रुपये.

ब)निराशादायक निकाल : २४० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २२५ रुपयांपर्यंत घसरण.

२)  गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड.

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, ९ नोव्हेंबर   

४ नोव्हेंबरचा बंद भाव – १,२५८.८० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,२१५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,२१५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,४५० रुपये.

ब)निराशादायक निकाल : १,२१५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,१५० रुपयांपर्यंत घसरण.

३) टाटा मोटर्स लिमिटेड  

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ९ नोव्हेंबर       

४ नोव्हेंबरचा बंद भाव – ४२५.३५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४४० रुपये, द्वितीय लक्ष्य ४७० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४२५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३९० रुपयांपर्यंत घसरण.