मॅरिको लिमिटेड ही ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करणारी भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. इतर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मात्यांप्रमाणे मॅरिको लिमिटेड हीदेखील ताळेबंदात मोठी रोकड सुलभता असलेली कंपनी आहे. २००२ मध्ये मॅरिको लिमिटेडचे व्यवस्थापन ही रोकड वापरण्यासाठी योग्य व्यावसायिक संधीच्या शोधात होते. त्या वेळी त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या बाजारपेठांच्या अभ्यासांती त्वचा व केसाच्या उपचार देणाऱ्या व्यवसायात मोठय़ा संधी आहेत, असे जाणविल्याने डिसेंबर २००२ मध्ये पहिले दालन ‘काया’ या नाममुद्रेने सुरू झाले. हा व्यवसाय विस्तारून दालनांची संख्या वाढल्यानंतर मॅरिकोने हा व्यवसाय एका स्वतंत्र कंपनीत हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०१३ मध्ये मॅरिको काया एन्टरप्राईज लिमिटेड ही कंपनी मॅरिकोची एक उपकंपनी म्हणून स्थापित झाली व त्वचेच्या व केसाच्या निगराणीचा व्यवसाय या कंपनीकडे हस्तांतरित झाला. ऑक्टोबर २०१३ मध्ये मॅरिको काया एन्टरप्राईज लिमिटेड कंपनीचे मॅरिकोच्या उपकंपनीतून एका स्वतंत्र कंपनीत रूपांतर होऊन कंपनी भांडवली बाजारात १ जुल २०१४ रोजी सूचिबद्ध झाली. टं१्रू ङं८ं एल्ल३ी१स्र्१्र२ी२ या शब्दसमूहातून कंपनी टंङए या आद्याक्षरांनी भांडवली बाजारात ओळखली जाते. कंपनीच्या ‘काया स्किन क्लिनिक’ व ‘काया स्कीन बार’ या दोन प्रमुख नाममुद्रा आहेत. कंपनीची दालने ‘काया स्कीन क्लिनिक’ या नावाने ओळखली जातात. दुकाने ‘काया स्किन बार’ या नावाने ओळखली जातात. कंपनीची १८ दालने मध्य पूर्वेत तर भारतातील २६ शहरांमधून ८१ दालने कार्यरत आहेत. कंपनीने सिंगापूरमधील ‘डर्मा आरएक्स’ ही मे २०१० अधिग्रहित केलेली कंपनी जानेवारी २०१४ मध्ये विकली. कंपनी आपल्या ग्राहकांना या दालनांतून त्वचेच्या निगराणीसाठी वैयक्तिक सल्ला व उपचार पुरविते. कंपनीकडे १४० त्वचा विकारतज्ज्ञ या दालनांतून दिल्या जाणाऱ्या सल्ला व सेवांच्या दर्जाचे नियंत्रण करत असते. वय लपविणाऱ्या (अ‍ॅण्टी एजिंग) चेहऱ्यावरील काळ्या डागांवर (पिगमेंट) नको असलेल्या जखमेच्या खुणा, अकाली केस गळणे या व्यतिरिक्त त्वचेचा तजेला टिकविणारे नमित्तिक उपचार अशा एकूण ५०हून अधिक सेवा व त्वचेच्या उपचारासाठी वापरावयाची ३५ उत्पादने या दालनांतून विकली जातात.
कुठलाही व्यवसाय सुरू होत असताना मोठय़ा भांडवलाची गरज असते व कोणताही व्यवसाय नफा कमाविण्यासाठी काही काळ जावा लागतो. सुरुवातीच्या दिवसांत होणारा तोटा थांबला असून या तिमाहीत कंपनीने परिचालित फायद्याची नोंद केली आहे. कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप हे स्थिर खर्चाचे असून कर्मचारी वेतन खर्चापकी प्रमुख घटक आहे. हा कंपनीच्या सेवेत मोठय़ा संख्येने असलेल्या या त्वचा विकारतज्ज्ञांचे वेतन हे तोटा होण्याचे एक प्रमुख कारण होते. एकूण खर्चाच्या तुलनेत या त्वचा विकारतज्ज्ञांचे वेतन हे एकूण खर्चाच्या ३५ टक्के आहे. चार तिमाही आधी या वेतनाचा एकूण खर्चाच्या तुलनेत वाटा ४५ टक्के होता येत्या वर्षभरात हा वाटा २५ टक्क्यांहून कमी होण्याची शक्यता वाटते. स्थिर खर्चाचे प्रमाण कमी झाल्यामुळे परिचलित नफा (Operating Profit) सध्याच्या ५ ते ६ टक्क्यांवरून १२ ते १५ टक्के होण्याची शक्यता आहे. हे नफ्याचे प्रमाण एफएमसीजी व्यवसायात आदर्श समजले जाते.
कंपनीचा महसूल उत्पादने व सेवा या दोन प्रकारांतून येतो. ‘काया स्किन क्लिनिक’साठी ४५० ते ५०० चौरस फूट व्यावसायिक जागा लागते. कंपनीने मॉल वगैरे ग्राहक सहज येण्याच्या ठिकाणी १०० ते १२५ चौरस फूट जागेत ‘काया स्किन बार’ सुरू केले आहेत. या ठिकाणी ‘काया’ची सेवा नसून फक्त उत्पादने विकली जातात. सध्या या दुकानातून होणारी विक्री १८ टक्के आहे. पुढे ही विक्री एकूण विक्रीच्या ३५ टक्के होण्याची व्यवस्थापनाला आशा आहे. सध्या प्रत्येक तिमाहीत २० ते २५ ‘काया स्किन बार’ उघडण्याचे कंपनीचे धोरण आहे. पुढील तीन वर्षांत कमी खर्चाच्या ‘काया स्किन बार’ व जास्त खर्चाच्या ‘काया स्किन क्लिनिक’ यांचा विक्रीत समान वाटा असण्याचे व्यवस्थापनाचे धोरण आहे. या धोरणामुळे तीन वर्षांत कंपनीच्या परिचलित नफ्याची पातळी १८ ते २० टक्के  दरम्यान राहील, अशी आम्हाला आशा वाटते.
महत्वाचा खुलासा :
विश्लेषकांनी त्यांच्या कंपनीकडून सल्ला घेणाऱ्या ग्राहकांना या कंपनीच्या समभागांत गुंतवणुकीची शिफारस केली आहे. त्यानुसार ‘हेज फंडां’कडून ही गुंतवणूक झालीही असेल किंवा भविष्यात ते गुंतवणूक करतील. यामुळे या कंपनीच्या समभागांच्या किंमतीत वाढ होणे हे विश्लेषकाच्या स्वारस्याचे ठरू शकते, याची वाचकांनी दखल घ्यावी.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corpotae beauty parlour marico kaya enterprises
First published on: 08-09-2014 at 05:02 IST