केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या एक पाठोपाठ एक उपाययोजनांनंतरही चलन बाजारातील रुपयाचे अवमूल्यन निरंतर सुरूच आहे. सरलेल्या शुक्रवारी रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ६२.०३ सार्वकालिक नीचांकापर्यंत नांगी टाकली. अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी रुपयाची ही अशीच घसरगुंडी सरकार निमूटपणे पाहत बसणार नाही असे नमूद करतानाच, रुपयाच्या विनिमय दराची नेमकी पातळी मात्र गृहित धरली गेली नसल्याचे स्पष्ट केले. तथापि अनेक विदेशी अर्थसंस्थांनी मात्र रुपया येत्या काळात आणखी खोलात जाऊ शकेल अशी भाकीते केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण काळजी का करावी?
* एका डॉलरसाठी एप्रिलमधील “५३ ऐवजी आता “६२ मोजावे लागणे, म्हणजे चार महिन्यांपूर्वी १.३२ लाखांत शक्य असलेल्या विदेशातील सहलीला आता दीड लाख मोजावे लागतील.
*  स्मार्ट फोन्स, एलसीडी टीव्ही, एसी या सध्या गरज बनलेल्या ग्राहकोपयोगी वस्तू, आयातीत औषधे महागणार.
*  विदेशात शिक्षणाची फी वाढली नाही तरी खर्च वाढणार
*  तेल कंपन्यांच्या कच्चे तेल आयातीचा खर्च वाढणार, ज्यातून पेट्रोल-डिझेलच्या किमती अपरिहार्यपणे वाढणार .
* पर्यायाने वाहतूक खर्चात वाढ होऊन, सर्व सेवा-वस्तूंच्या किंमती भडकणार आणि आधीच कडाडलेल्या
    महागाईचा भडका होणार!
* जोवर महागाई उसंत घेत नाही, तोवर कर्ज-फेडीच्या हप्त्यांचा भार हलका होणे नाही.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias rupee plunges to new low
First published on: 19-08-2013 at 09:04 IST