हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजला यंदा २५ वष्रे पूर्ण झाली. १९९० मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने गेल्या २५ वर्षांत नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली आहे. माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि बीपीओ इ. क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीकडे सध्या ११,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. जगभरात सेवा पुरवणाऱ्या या कंपनीच्या महत्त्वाच्या ग्राहकांत बँकिंग, कॅपिटल मार्केट, इन्शुरन्स, वाहतूक आणि आरोग्य निगा अशा अनेक क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापकी ८१% महसूल अमेरिकेतील सेवांपासून येत असून १४% उत्पन्न युरोपमधून येते. भारतीय कंपन्यांतील आऊटसोìसगमधील हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज ही एक अग्रगणी कंपनी असून चेन्नई, पुणे, मुंबई आणि बंगळुरू येथे कंपनीची कार्यालये आहेत. गेल्याच वर्षांत कंपनीने सिंगापूर येथेही आपले कार्यालय चालू केले आहे. कंपनीची मुख्य सेवा बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रासाठी असून येत्या आíथक वर्षांकरिता कंपनीच्या सेवांना चांगली मागणी आहे. अमेरिकेतील सुधारत असलेली आíथक परिस्थिती आणि घसरलेला रुपया कंपनीसाठी फायद्याचा ठरणार आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ३४८.४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९४.३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेली तीन वष्रे कामगिरीत सातत्य दाखवणाऱ्या हेक्झावेअरकडून येत्या आíथक वर्षांतदेखील उत्तम कामगिरी अपेक्षित आहे. कुठलेही कर्ज नसलेली आणि आपल्या भागधारकांना उत्तम लाभांश देणाऱ्या (गतवर्षी ४७३%) या कंपनीतील गुंतवणूक तुम्हाला वर्षभरात २५% परतावा देऊ शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2015 रोजी प्रकाशित
सातत्यपूर्ण कामगिरीची ‘अमेरिकी’ हमी!
हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजला यंदा २५ वष्रे पूर्ण झाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-12-2015 at 00:53 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about hechavarria technology