फंडाविषयक विवरण
फंड प्रकार : समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार : समभाग गुंतवणूक असल्याने जोखीम अधिक (मुद्दलाची खात्री नाही)
गुंतवणूक : हा मल्टि-कॅप प्रकारचा फंड आहे. या फंडाने ६० टक्के निधी लार्ज कॅपमध्ये तर ४० टक्के निधी मिड कॅप प्रकारच्या कंपन्यांच्या समभागांत गुंतविला आहे. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आधी गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू होते. एका वर्षांनंतर गुंतवणूक बाहेर पडल्यास काहीही शुल्क अधिभार लागत नाही.
फंड गंगाजळी : ३१ जुल २०१५ रोजी फंडाची मालमत्ता- ३,१५२ कोटी रुपये
निधी व्यवस्थापक : हर्ष उपाध्याय हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. कोटक म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी त्यांनी डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्समध्ये व यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट या दोन निधी व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या कंपन्यांतून जबाबदारीची पदे भूषविली आहेत.
गुंतवणूक पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड : पे आउट व रिइंव्हेंस्ट)
अन्य माहिती : फंड घराण्याच्या www. assetmanagement.kotak.co या संकेतस्थळावरून थेट खरेदी किंवा फंडाच्या विक्रेत्यांमार्फत
हा फंड मल्टि-कॅप प्रकारचा फंड आहे. या फंडाच्या माहिती पत्रकातील तपशिलानुसार निधी व्यवस्थापक भविष्यात उजवी कामगिरी करणारी उद्योग क्षेत्रे निवडून त्या क्षेत्रातील निवडक समभागात गुंतवणूक करतील. उद्योगक्षेत्र केंद्रित परंतु निधी व्यवस्थापनाचे सक्रिय धोरण अवलंबिले जाते. उद्योग क्षेत्राची निवड प्रामुख्याने या क्षेत्रांचे मूल्यांकंन (पी/ई) यावर अवलंबून असेल. निधी व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार हा फंड डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड आहे. जेव्हा परिस्थिती गुंतवणुकीस अनुकूल असेल तेव्हा मिडकॅपमधील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्के असू शकेल. त्याचवेळी जोखीम सुसह्य असावी म्हणून सर्वसाधारणपणे गुंतवणुकीत एकावेळी किमान ४५ समभाग व कुठल्याही उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक ३३ टक्क्याहून अधिक असणार नाही. कमीत कमी चार उद्योग क्षेत्रात गुंतवणूक असेल याची दक्षता घेण्यात येते. हे जरी असले तरी एकूण गुंतवणुकीचे धोरण ठरविणे व जोखीम व्यवस्थापन या दोन गोष्टी सर्वस्वी निधी व्यवस्थापकाच्या अखत्यारीत असतील. नोव्हेंबर २०१२ पासून बँकिंग, माहिती-तंत्रज्ञान, वाहन उद्योग व पूरक उत्पादने या क्षेत्रांना निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येकी दहा हजार या फंडात व फंडाच्या संदर्भ निर्देशांकात १२ मे २०१२ रोजी गुंतविले असतील तर या दहा हजाराचे ३० एप्रिल २०१५ रोजी अनुक्रमे १९,८५८ रु. आणि १६,०५२ रु. झाले असते. या फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक गुंतवणूक बँकिंग, सीमेंट, वाहन उद्योग यात केली आहे तर निर्देशाकांत असलेल्या पेक्षा कमी गुंतवणूक माहिती तंत्रज्ञान, तेल व नसर्गिक वायू, औषध निर्मिती यांत केली आहे. मल्टि-कॅप गटात हा फंड गुंतवणुकीवरील सशक्त परतावा देणारा एक पर्याय म्हणून उदयास येत आहे. हा फंड अव्वल परतावा देण्यासाठी मर्यादित धोका पत्करून गुंतवणूक करणारा फंड आहे. या फंडाचे निधी व्यवस्थापक हे मल्टि-कॅप गटात अव्वल कामगिरी असणारे निधी व्यवस्थापक आहेत.
research@fundsupermart.co.in
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2015 रोजी प्रकाशित
कोटक सिलेक्ट फोकस फंड
या फंडाच्या माहिती पत्रकातील तपशिलानुसार निधी व्यवस्थापक भविष्यात उजवी कामगिरी करणारी उद्योग क्षेत्रे निवडून त्या क्षेत्रातील निवडक समभागात गुंतवणूक करतील.
First published on: 24-08-2015 at 07:48 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kotak select focus fund