येणाऱ्या दिवसातील बाजाराच्या घातक चढ-उतारांसाठी सुसज्जता करणारे हे विवेचन
आर्थिक विकासदर पाच टक्क्यांच्या आसपास रेंगाळणार, डिसेंबरअखेर औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग हा एक टक्क्यांच्या खाली म्हणजे उणे ०.६% आला आहे, रिझव्‍‌र्ह बँकेने कठोर उपाययोजना करून अजूनही महागाई म्हणावी तशी आटोक्यात येत नाही आहे. (जानेवारी अखेर चलनवाढ दर ६.६२% आहे.) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल तेजीचा आलेख दाखवीत आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसात या सर्व निराशाजनक बातम्या तेजीच्या वारुला (घोडय़ाला) लगाम घालणार की परदेशस्थ गुंतवणूकदार अर्थसंस्थांच्या पशावर स्वार होऊन नवीन उच्चांकाला गवसणी घालणार याचा आढावा निश्चितच लाखमोलाचा ठरतो.
नोव्हेंबर २०१२ पासून जी तेजी सुरु झाली तिचे प्रायोजकत्व हे परदेशस्थ गुंतवणूकदार संस्था अर्थात ‘एफआयआय’कडे जाते. त्यांच्या नजरेतून आपण तेजी-मंदीचा तुलनात्मक आढावा घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एफआयआयचा तेजीचा कल दर्शविणाऱ्या घटना       
१)    जानेवारी २०१३ महिन्याभरात एफआयआयनी सात हजार कोटीची समभाग खरेदी केली.       
२)    सात हजार कोटींची खरेदी करूनही निफ्टी निर्देशांक फक्त २०० अंशांनी वाढला. (५९०० वरुन ६१००)       
३)    निर्देशांक उच्चांकावर म्हणजे सर्व समभागात तेजी अपेक्षित नसली तरी कमीत कमी निफ्टी समभागांमध्ये तरी तेजी अपेक्षिणे गैर ठरणार नाही. तसेच वाढलेले समभाग व घसरलेले समभाग यांचे गुणोत्तर (अ‍ॅडव्हान्स- डिक्लाइन अर्थात ए-डी रेशो) तेजीच्या बाजूने       
वरील तुलनात्मक विवेचनावरून आता चालू असलेली वाढ ही ‘बाळसे आहे की सूज’ हाच प्रश्न मनाला पडतो व यात भरीस भर म्हणजे याच महिन्यात बाजाराच्या धारणेला कलाटणी देणाऱ्या अर्थसंकल्पाची टांगती तलवार व अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर होणार आहे, त्याच दिवशी फ्चुचर ऑप्शनच्या फेब्रुवारी मालिकेचा सौदापूर्तीचा शेवटचा दिवस, अशा दुहेरी कात्रीत गुंतवणूकदार सापडला आहे. तेव्हा शुद्ध आर्थिक विचार केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर झाल्यास बाजाराची संभाव्य वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तरतूदी बाजाराला तेजीकारक वाटल्या तर :
निफ्टी निर्देशांक ५९५० ते ६०००; तर मुंबई बाजार निर्देशांक- सेन्सेक्स १९,७००च्या पातळीवर तोवर तग धरून राहिला, तर निफ्टी त्या पल्याड ६१०० आणि सेन्सेक्स २०,२०० वर झेपावेल व तेथून पुढे निफ्टी ६२०० ते ६३०० व सेन्सेक्स २१,००० अंशाला गवसणी घालायचा प्रयत्न करेल.

अर्थसंकल्पाच्या तरतूदी निराशाजनक/ मंदीकारक वाटल्या तर :
निफ्टी निर्देशांक ५८०० तर मुंबई बाजार निर्देशांक १९१००चा आधार तोडून अनुक्रमे ५४०० ते ५५५० आणि १८,००० पर्यंत खाली येईल.
थोडक्यात निफ्टीवर ५८०० ते ५९५० आणि मुंबई बाजार निर्देशांकावर १९,१०० ‘कल निर्धारक पातळ्या’ (ट्रेंड डिसाइिडग लेव्हल्स) आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यावर निर्देशांक या पातळ्यांवर पाच दिवस टिकणे म्हणजे तेजी गृहीत धरावी व या पातळ्या तोडून निर्देशांक खाली आला की मंदी गृहीत धरावी.
येणाऱ्या दिवसातील बाजाराच्या घातक चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी वाचकांना वरील विवेचन उपयुक्त ठरेल ही अपेक्षा.
(महत्वाची सूचना :  वरील लेखात निर्देशांकाची संभाव्य वाटचाल कशी असेल याचा आढावा घेण्यात आला आहे. हे असच घडेल याची हमी देता येत नाही. सबब गुंतवणूकदारांनी घेतलेल्या कुठल्याही आíथक निर्णयातील नुकसानीसाठी प्रस्तुत लेखक अथवा ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’ला जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market observationcontrol of fact on up market
First published on: 18-02-2013 at 02:22 IST