मध्यावधीत फायदेशीर!

व्हीए टेक वाबाग ही जगातील सर्वात मोठी पाण्याचे नियोजन, निस्सारण आणि व्यवस्थापन (वॉटर ट्रीटमेंट) करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १९२४ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीची मुख्य कार्यालये भारतातील चेन्नई आणि ऑस्ट्रियातील

व्हीए टेक वाबाग ही जगातील सर्वात मोठी पाण्याचे नियोजन, निस्सारण आणि व्यवस्थापन (वॉटर ट्रीटमेंट) करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १९२४ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीची मुख्य कार्यालये भारतातील चेन्नई आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे आहेत. भारतात कंपनीने काही मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करून यशस्वीरीत्या राबवले आहेत. यामध्ये मुंबईतील महानगपालिकेच्या प्रकल्पाखेरीज प्रामुख्याने दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स, चेन्नईतील चेन्नई मेट्रोपोलिटियन वॉटर सप्लाय, कोलकात्यातील वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट, रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीमधील कार्यान्वित केलेला आशियातील सर्वात मोठा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रकल्प आदी अनेक प्रकल्पांचा समावेश करावा लागेल. कंपनीने आपल्या व्यवसायाचे ईपीसी, म्युनिसिपल बिजनेस ग्रुप (टइॅ), इंटरनॅशनल बिजनेस ग्रुप (कइॅ), ऑपरेशन बिजनेस ग्रुप (डइॅ), इंडस्ट्रियल वॉटर ग्रुप (कहॅ) असे विकेंद्रीकरण केले आहे. जागतिक मंदीचा कंपनीच्या कामगिरीवर विशेष परिणाम झालेला दिसत नाही. गेल्या आíथक वर्षांत २,४८९ कोटी रुपयांची कामे मिळवणाऱ्या वाबागकडे यंदाही ओघ सुरूच राहील, अशी अपेक्षा आहे. केवळ ५.३१ कोटी रुपयांच्या भागभांडवलावर कंपनीने गेल्या आíथक वर्षांत १,०४२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९० कोटी रुपयांहून अधिक नफा कमवला आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून यंदाच्या आíथक वर्षांत कंपनीला भारतातील अनेक मोठय़ा नगरपालिकांकडून तसेच काही राज्यांकडून मोठय़ा कंत्राटाची अपेक्षा आहे. सुमितोमोच्या सहकार्यानेदेखील काही प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच व्हीए टेक वाबागची खरेदी गुंतवणूकदारांना मध्यम कालावधीसाठी फायद्याची ठरेल यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profitable company

Next Story
बाजाराचे तालतंत्र : तेजीवाल्यांची सरशी ‘निफ्टी’ला कुठवर नेईल?
ताज्या बातम्या