पुट विक्रीचे नियम

मागील अभ्यास वर्गामध्ये आपण कॉल विकण्याबाबतच्या नियमांच्या सविस्तर अभ्यास केला आजच्या अभ्यास वर्गामध्ये आपण पुट विक्रीच्या

मागील अभ्यास वर्गामध्ये आपण कॉल विकण्याबाबतच्या नियमांच्या सविस्तर अभ्यास केला आजच्या अभ्यास वर्गामध्ये आपण पुट विक्रीच्या नियमांचा व त्यासोबत असणाऱ्या अनेक ठळक वैशिष्टय़ांचा अभ्यास करू.
पुट विकणे (Short PUT) : नग्न पुट विकण्याला काही वेळा पुट लिहिणे (Put Writer) व अनआच्छादित पुट विकणे असेही म्हणतात. ह्या ठिकाणी आपण अगोदर पुट खरेदी केले व आता आपण विकत आहोत असे नसून, प्रथम नग्न पुट विकत आहोत. निव्वळ नग्न पूट विक्री करणाऱ्यांचा तोटा अमर्याद असतो व नफा मर्यादित असतो, हे आपण मागील अभ्यास वर्गामध्ये जाणून घेतले आहे.
पुट विकणे (Short PUT) : बाजार / शेअर्स रेंगाळणार असेल, वर जाणार असेल किंवा एकत्रिकरण (Consolidation) मध्ये असेल किंवा खाली जाणार नाही ह्याची खात्री असेल तर कॉल विकावे.
डेल्टा परिणाम : शेअर्सची किंमत वर जात असल्यास पुटचे प्रीमिअम कमी होते.
वेगा परिणाम : अस्थिरता (volatility) कमी झाल्यास पुटचे प्रीमिअम कमी होते.
थिटा परिणाम : प्रत्येक दिवसागणिक पुटचे प्रीमिअम कमी होते.
कधी विकावे : वरील सर्वाचा एकत्रित परिणाम लक्षात घेता शेअर्सवर जाणार असेल तर ठीकच आहे. परंतु खाली नक्की जाणार नसेल एकत्रिकरण (Consolidation)
 मध्ये जास्तीत जास्त राहणार असेल घटना घडून गेल्याने अस्थिरता (volatility) कमी होणार असेल तेव्हा कॉट्रारियन थेरी (Contrarian Theory) नुसार शेअर्स बुल पुश एरियामध्ये आलेला असेल किंवा आपल्या पद्धतीप्रमाणे आता बाजार वर जाईल असे वाटल्यास योग्य स्ट्राइकचा पुट विकावे.
कधी बाहेर पडावे : शेअर्सची दिशा मंदीची (Bearsih) वाटत असल्यास तात्काळ झालेले नुकसान सहन करून बाहेर पडावे कारण अमर्याद तोटा असणारा प्रकार आहे. किंवा अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
av-06
तरलता (Liquidity):  तरलता म्हणजे मोठय़ा प्रमाणात व्यवहार होणे, एक लाख किंवा कमीत कमी ५०,००० हजारांपेक्षा जास्त उलाढाल (Turnover) असली म्हणजे त्या शेअर्स किवा फ्यचर्समध्ये तरलता आहे असे समजावे.
एखाद्या शेअर्सचे विकल्प खरेदी किवा विक्री करताना त्या शेअर्स, फ्युचर्स व खरेदी किंवा विक्रीसाठी निवडलेल्या विकल्पांच्या स्ट्राइकसुद्धा तरलता आहे किंवा नाही ते पाहावे. जर तरलता नसेल तर त्या विकल्पामध्ये व्यवहार करू नये. तरलता असलेल्या शेअर्सच्या सर्वच विकल्पांच्या स्ट्राइकमध्ये तरलता असेलच असे नाही, कारण एटीएम विकल्पामध्ये जास्तीत जास्त तरलता असते व जसजसे विकल्प ओटीएम किंवा आयटीएम होतात तसतशी तरलता कमी
कमी होईल.
उदाहरणार्थ : मी २० मार्च २०१५ रोजी टाटा स्टील या शेअर्सचा अभ्यास केला असता तांत्रिक दृष्टिकोनातून मला असे दिसले की,
१) ऐतिहासिक किमतींचा अभ्यास केला असता असे दिसून आले की टाटा स्टील २/८/२०१३ रोजी रुपये २०२ होता. २) ६/६/२०१४ ला त्या शेअर्सची किंमत रु. ५६० होती. म्हणजे रु. ३५८ ची वाढ झाली. ३) २०/०३/२०१५ ला त्याची किंमत रु.३२९ म्हणजे वाढीच्या ६१.८०% खाली पडली. (Fibonassi No)
४) मागील काही दिवसांत किंमत नीचांक रु. ३२३ पासून ३२९ पर्यंत वाढायला लागलेत. त्यामुळे हा शेअर्स अजून खाली पडेल असे वाटत नाही; परंतु तत्काळ वर जाईल असेही वाटत नाही. तात्काळ वर जाईल असे वाटत असेल तर मी कॉल खरेदी केला असता, कोणत्याही महत्त्वाच्या घटना समोर दिसत नाहीत. त्यामुळे समोर अस्थिरता ((Volatility दिसत नाही त्यामुळे मी पुट विकण्याचा निर्णय घेतला.
तरलतेचा विचार केला असता ३२० व ३३० या स्ट्राइकच्या पुटमध्ये तरलता आहे व वरील अनेक कारणांमुळे ३३०च्या खाली जाणार नाही असे वाटते.
वरील उदाहरणामध्ये आपण पुट विकलेला आहे त्यामुळे डेल्टा व थिटाचे चिन्ह जरी वजा दर्शवले असेल तरी त्या ग्रीक्सचा आपणास फायदा होणार आहे.
av-07
प्रत्येकाची तांत्रिक अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असल्याने प्रत्येकाने ह्या शेअर्सचे भाव कमी झाल्यास तो जास्तीत जास्त किती खाली जाईल याचा विचार करावा व शक्यतो त्या किमतीजवळ आल्यास पुट विकावा त्यामुळे जास्तीत जास्त किंमत आपल्या खात्यात जमा होऊ शकेल, थोडय़ा दूरचा पुट विकल्यास अधिमूल्य कमी असल्याने कमी पसे आपल्या खात्यात जमा होतील परंतु पसे कमवण्याची खात्री वाढेल. बाजारखाली जात असता पुटचा भाव वाढत असतो त्यामुळे एटीएम पुटची किंमत खूप जास्त असते त्यामुळे जास्त रक्कम पदरी पडावी या हेतूने नवशिखे ट्रेडर्स एटीएम पुट विकण्याची चूक करतात. खालील महत्त्वाचे नियम वाचकांनी लक्षात घ्यावे :
१) दिशा मंदीची असल्यास पुट विकू नये.
२) पुट विकला असता नुकसान रोधक (Stop Loss)लावावाच कारण अमर्याद तोटा होऊ शकतो. डेल्टा, थिटा, गॅमा, वेगा इत्यादींचा अभ्यास केला व नजीकच्या काळात आणखी तो ३३०च्या खाली जाणार नाही याचा अंदाज घेऊन केवळ चार दिवसांमध्ये थोडा धोका पत्करू शकणाऱ्या आक्रमक ट्रेडर्सनी ३३०चा पुट विकून रुपये ३२००चा नफा कमवूशकतात व सावध, कमी धोका पत्करणाऱ्या ट्रेडर्सनी ३२०चा पुट विकून रुपये १००० चा नफा कमवू शकतात.
काही शैक्षणिक संस्थांनी सदर अभ्यास वर्ग त्यांच्या विधार्थ्यांसाठी खूप उपयोगाचे आहेत असे कळवले. अनेक वाचकांनी सदर मालिकेबद्दल ‘लोकसत्ता’ व मलाही धन्यवाद दिले. काही वाचकांनी उल्लेख केलेल्या संकल्पनांचा प्रत्यक्षात ट्रेिडग करताना आलेल्या अडचणी व्यक्त केल्यात अश्या वेळी आपण आपल्या सल्लागाराशी संपर्क साधावा किंवा खालील ई-मेल वरती संपर्क साधावा. चालू बाजारातील उदाहरण केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे कृपया वाचकांनी लेखकाचा हा सल्ला आहे असे समजू नये. त्यामुळे योग्य प्रशिक्षकाकडून ज्ञान घेऊनच ट्रेड करावे, असा या ठिकाणी सल्ला द्यावा वाटतो.
——————————-
(विशेष सूचना : सदर लेखात शेअरचा उल्लेख केवळ उदाहरण म्हणून केला गेला असून, तो फक्त संकल्पना समजून सांगण्यासाठी आहे. कृपया वाचकांनी हा लेखकाने दिलेला सल्ला अथवा खरेदीची शिफारस आहे असे समजू नये.
तथापि योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)
info@primetechnicals.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rules of short put

ताज्या बातम्या