Sensex Today : सेन्सेक्स अडखळला; मोठ्या घोडदौडीनंतर ४०० अंकांची घसरण!

आज शेअर मार्केट उघडताच सेन्सेक ४०० अंकांनी खाली घसरल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच, निफ्टीनंही सेन्सेक्सच्याच पावलावर पाऊल ठेउन घसरण दर्शवली.

sensex-bse
संग्रहीत छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून रोज नवनवे उच्चांक नोंदवणारा सेन्सेक्स आज अडखळल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स थेट ४०० अंकांनी घसरला. निफ्टीनंही सेन्सेक्सीच री ओढत १८ हजार १०० अंकांपर्यंत घसरगुंडी घेतली. त्यामुळे भागधारकांच्या कपाळावर चांगल्याच आठ्या पडल्या. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, इन्फोसिस, एक्सिस बँक, टायटन, आयटीसी आणि टाटा स्टील यांच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण आल्याचा देखील सेन्सेक्सवर परिणाम झाला. बाजार उघडताच २६६ अंकांनी घसरलेला सेन्सेक्स पुढच्या अर्ध्या तासात अजून १२५ अंकांनी खाली गेला.

सेन्सेक्सनं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी वाढ दर्शवली होती. मात्र, गुरुवारी शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स घसरल्याचं दिसून आलं ४०० अंकांनी घसरलेला सेन्सेक्स थेट ६० हजार ७०५ अंकांपर्यंत खाली आला. त्यासोबतच, निफ्टीनं देकील ५० अंकांची घसरण दर्शवल्यामुळे निफ्टी ५० देखील १८ हजार ०६२ अंकांपर्यंत खाली आला.

नंतर काहीशी सुधारणा करत सेन्सेक्स ६० हजार ७७५ अंकांपर्यंत तर निफ्टी १८ हजार ०८७ अंकांपर्यंत वर आला.

बुधवारी देखील काही प्रमाणात सेन्सेक्स घसरल्याचं दिसून आलं. एक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स तब्बल २०७ अंकांनी घसरला. जागतिक स्तरावर बाजारांमध्ये देखील अशाच प्रकारचा ट्रेंड दिसून आल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील शेअर बाजारांमध्ये दिसून आल्याचं देखील सांगितलं जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex today down 400 points nifty50 also lowers to 18100 in bse share market pmw

ताज्या बातम्या