scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल : सहज मी छेडिता तार झंकारली

सहज तेजीची तार छेडिता, निफ्टी निर्देशांकावर दोन हजार अंशांची तेजी झंकारली, अशी झाली असेल.

|| आशीष ठाकूर

तांत्रिक-विश्लेषणाच्या अंगाने निफ्टी निर्देशांकाच्या विविध स्तर आणि वाटचालींचा पूर्ववेध घेणारे साप्ताहिक सदर..

निफ्टी निर्देशांक जेव्हा १८,६०० वरून १६,४०० वर कोसळला, तेव्हा आता मंदी आवरती घेऊन, तेजीचा विचार केला पाहिजे असे या स्तंभातून सुचविलेलं.. त्या वेळची एकंदर धास्तावलेली अवस्था पाहता तो अनेकांसाठी सुखद दिलासा, तर काहींना त्यावर विश्वास ठेवणे अवघड ठरले असावे. त्यांच्यासाठी आताची स्थिती.. सहज तेजीची तार छेडिता, निफ्टी निर्देशांकावर दोन हजार अंशांची तेजी झंकारली, अशी झाली असेल. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव

 सेन्सेक्स : ६१,२२३.०३

 निफ्टी : १८,२५५.७५

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाने तिला आवडणारी ‘अतिजलद भूमिती श्रेणीतील’ वाटचाल स्वीकारल्याने सरलेल्या सप्ताहात गुरुवार, शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने १८,२८६ वरून १८,१२० अशा दिवसांतर्गत क्षणिक घसरणीची अनुभूती दिली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने १८,००० ते १७,८०० चा स्तर राखल्यास, पुन्हा तीनशे अंशांचा फेर धरत निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्ये ही १८,३००.. १८,६००.. १८,९०० अशी असतील.

निकालपूर्व विश्लेषण

१) बजाज फायनान्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १८ जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – ७,८१६.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,३५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७,८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७,४०० रुपयांपर्यंत घसरण.

२) टाटा एलेक्सी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १८ जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – ६,३१४.७० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ५,९५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ७,५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ५,९५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५,३५० रुपयांपर्यंत घसरण.

३) बजाज ऑटो लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १९ जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – ३,४३६.४५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३,४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,२०० रुपयांपर्यंत घसरण.

४) एशियन पेंट्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २० जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – ३,३६४.८० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३,४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,१०० रुपयांपर्यंत घसरण.

५) बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २० जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – १८,१८८ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १८,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १८,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १९,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य २०,००० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १८,००० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १७,२०० रुपयांपर्यंत घसरण.

६) बायोकॉन लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार,२० जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – ३५७.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३५५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३५५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३८० रुपये, द्वितीय लक्ष्य ४२५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३५५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३२५ रुपयांपर्यंत घसरण.

७) हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २० जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – २,३६४.५० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,३५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४८० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,३५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत

                २,२०० रुपयांपर्यंत घसरण.

८) आयसीआयसीआय बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, २२ जानेवारी

१४ जानेवारीचा बंद भाव – ८१८.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८५० रुपये, द्वितीय लक्ष्य ९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत

७५० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com  

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Technical analysis sunex nifty share market index akp

ताज्या बातम्या