News Flash

आजचं राशीभविष्य, रविवार, ११ एप्रिल २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:- अतिविचार करणे टाळावे लागेल. कामाचा बोजा वाढल्याने थकवा जाणवेल. आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. आपली संगत तपासून पहावी. वाचनातून रहस्यमय गोष्टींची आवड पूर्ण कराल.
  2. वृषभ:- कामात चिकाटी ठेवावी लागेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील. तरुण वर्गाचे मत विचारात घ्याल.
  3. मिथुन:- मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कमिशनमधून चांगला लाभ होईल. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
  4. कर्क:- अधिकारी व्यक्तींचा सल्ला मिळेल. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या बोलण्याची उत्तम छाप पडेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
  5. सिंह:- वडीलधार्‍यांचा योग्य मान ठेवाल. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी. लहान-सहान गोष्टींनी नाराज होऊ नका. अतिविचाराने मानसिक तान येऊ शकतो. छंदासाठी वेळ द्यावा.
  6. कन्या:- भागीदाराशी सलोखा वाढेल. नवीन व्यावसायिक धोरण ठरवाल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा होतील. सहकुटुंब जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
  7. तूळ:- जोडीदाराची आवक वाढेल. कौटुंबिक शांतता जपावी. काही कामे कमी कष्टात पार पडतील. अपचनाचा त्रास जाणवेल. कफ विकारांपासून काळजी घ्यावी.
  8. वृश्चिक:- जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो. पत्नीच्या सहवासात रमून जाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिक पाऊले जपून उचलावीत.
  9. धनू:- घरातील वातावरण खेळकर राहील. कामे आनंदात पार पडतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. दिवसभर कामात गुंतून राहाल.
  10. मकर:- आततायीपणे कोणतेही काम करू नका. जवळचा प्रवास घडेल. भावंडांची मदत घ्यावी लागेल. शांत व संयमी विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल.
  11. कुंभ:- सामाजिक बांधीलकी जपाल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. आवडीबाबत आग्रही राहाल. बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल. बाग-बगीच्याच्या कामात मन गुंतवाल.
  12. मीन:- सर्वांशी लाडिकपणे बोलाल. आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मैत्रीचे संबंध जपावेत.

     – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope sunday 11 april 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शनिवार, १० एप्रिल २०२१
2 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, ९ एप्रिल २०२१
3 आजचं राशीभविष्य, गुरूवार, ८ एप्रिल २०२१
Just Now!
X