28 January 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, रविवार, २७ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : आपण घेतलेल्या विचारपूर्वक निर्णयामुळे फायदा होईल. आप्तस्वकियांच्या भेटी होतील. आपले अंदाज अचूक ठरतील. जुने मित्र भेटतील त्यांच्याबरोबर आनंद लुटाल. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.
 2. वृषभ : मानसिक स्वास्थ लाभेल. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक कलह टाळावेत. नवीन कार्यारंभाचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.
 3. मिथुन : कुटुंबाबरोबर सहलीला जाण्याचा बेत आखाल. कुटुंबासाठी काही विशेष खरेदी केली जाईल. व्यवसायातील कामासाठी सरकारी परवाने मिळतील. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना चांगले लाभ होतील.
 4. कर्क : मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. आजचा दिवस गुंतवणूकीसाठी अनुकूल. आपली इच्छापुर्ती होईल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल.
 5. सिंह : नोकरीनिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. नोकरीत योग अधिकार प्राप्त होतील. आर्थिक उत्कर्षाच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.
 6. कन्या : आज आपण मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीतील कामानिमित्त प्रवास करावे लागतील. आजचा दिवस आपली इच्छापूर्ती करणारा आहे. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरेल.
 7. तूळ : कलाकारांसाठी आजचा दिवस भाग्याचा. कलेला अनपेक्षितपणे भरपूर वाव मिळेल. मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वामुळे प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल.
 8. वृश्चिक : नोकरीत जबाबदारीचे काम करावे लागेल. काळजी करू नका. सहकाऱ्यांच्या मदतीने काम पूर्ण होईल. सामाजिक कार्यात मानाचे स्थान लाभेल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल गोळा करण्यात यश येईल.
 9. धनु : नोकरीत केलेल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. त्यामुळे मानसिक स्थैर्य लाभेल. विरोधकांवर मात कराल. महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल.
 10. मकर : शैक्षणिकदृष्टीने प्रगतीकारक घटना घडतील. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. आपली इच्छापूर्ती होईल. भावंडांशी झालेले पूर्वीचे मतभेद गोड बोलून नाहीसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील.
 11. कुंभ : मामेभावंडांशी भेटी घडतील. व्यवसायात त्यांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिककार्यक्षेत्र वाढेल. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. जनसंपर्कातून लाभ होतील.
 12. मीन : घरगुती समारंभासाठी प्रवास करावा लागेल. संततीसंबंधी चांगली बातमी समजेल. आपले अंदाज अचूक ठरतील. समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल.


— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 1:00 am

Web Title: daily astrology horoscope sunday 27 december 2020 aau 85
टॅग Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शनिवार, २६ डिसेंबर २०२०
2 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २५ डिसेंबर २०२०
3 आजचं राशीभविष्य, गुरुवार, २४ डिसेंबर २०२० 
Just Now!
X