1. मेष:-कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विषय वासना वाढू शकते. हौसेचे मोल लक्षात घ्याल.
  2. वृषभ:-दिवस घाईगडबडीत जाईल. खिलाडू वृत्तीने वागाल. मित्रांशी पैज लावाल. बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील. उपासनेसाठी वेळ काढावा.
  3. मिथुन:-कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बागबगीच्याच्या कामात गुंग व्हाल. समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
  4. कर्क:-बौद्धिक छंद जोपासाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल. साहित्य प्रेम दर्शवाल. भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल.
  5. सिंह:-आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत. कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो. सामाजिक संबंध जपावेत.
  6. कन्या:-आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. स्वत:चे म्हणणे खरे कराल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत. काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील.
  7. तूळ:-मानसिक चंचलता जाणवेल. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी.
  8. वृश्चिक:-व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा. मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  9. धनू:-कामाची वेळेनुसार छानणी करावी लागेल. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. राग आवरता घ्यावा लागेल. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी.
  10. मकर:-धार्मिक स्थळांना भेट द्याल. तात्विक विचार मांडाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल. थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल.
  11. कुंभ:-दिवसभर कामाचा ताण राहील. बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पहावी.
  12. मीन:-बदलीची चिन्हे दिसतील. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. कामात उर्जितावस्था येईल. वैचारिक सुसूत्रता ठेवावी. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर