• मेष:-
    परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कामात सहभाग घ्यावा. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. कामात वारंवार बदल करू नका.
  • वृषभ:-
    व्यावहारिक कुशलता दाखवाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. वाद चिघळणार नाहीत याची काळजी घ्यावी. बौद्धीक ताण जाणवेल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा.
  • मिथुन:-
    लेखकांनी लेखणी जपून वापरावी. कामाचा उरक वाढेल. मुलांशी गप्पा मारल्या जातील. हसत-खेळत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. खोटे बोलू नका.
  • कर्क:-
    आपले मत आग्रहाने मांडाल. घरात नातेवाईक गोळा होतील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. कर्तेपणाचा मान मिळवाल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील.
  • सिंह:-
    योग्य तर्क व अनुमान काढाल. सर्व गोष्टींचा चौकसपणे विचार कराल. कलात्मक दृष्टिकोन ठेवाल. भावंडांचे प्रश्न जाणून घ्यावेत. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
  • कन्या:-
    तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. शक्यतो जोड शब्द वापरले जातील याकडे लक्ष द्यावे. धीटपणे निर्णय घ्याल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. दिवस आनंदात घालवाल.
  • तूळ:-
    अत्यंत चालखपणे वागणे ठेवाल. तुमच्यातील हजरजबाबीपणा दिसून येईल. हटवादीपणे निर्णय घेतले जातील. कौटुंबिक खर्च वाढेल. घरातील कामात दिवस जाईल.
  • वृश्चिक:-
    दिवस दगदगीत जाईल. अडथळ्यातून मार्ग काढावा. काही क्षुल्लक कारणाने कामे खिळून पडतील. पायाचे विकार जाणवतील. गोड पदार्थ खाण्याची हौस भागवाल.
  • धनु:-
    घरात मंगल कार्य होईल. मित्रांशी सुसंवाद साधावा. व्यापारात चांगला आर्थिक लाभ संभवतो. नवीन विचारांची जोड घ्यावी. जवळचा प्रवास मजेत होईल.
  • मकर:-
    यात्रेचे योग येतील. तुमच्यातील कल्पकता दाखवता येईल. कमिशनच्या कामातून फायदा काढाल. व्यावसायिक गोष्टींचा अंदाज बांधावा. छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळेल.
  • कुंभ:-
    मानसिक चंचलता जाणवेल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. बढतीसाठी प्रयत्न करावेत. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  • मीन:-
    चारचौघात तुमची कला सादर करता येईल. व्यवसायातील फायद्याचा पाठपुरावा करावा. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेद टाळावेत.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर