• मेष:-
    कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. औद्योगिक वातावरण चांगले राहील. व्यवसाईक ठिकाणी मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.
  • वृषभ:-
    तुमची सहृदयता दिसून येईल. चांगले साहित्य वाचाल. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. कलेला उत्कृष्ट वातावरण लाभेल.
  • मिथुन:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यांतून धनलाभ संभवतो. सासुरवाडीची मदत मिळेल. मुलांशी मतभेद संभवतात.
  • कर्क:-
    दिवस आनंदात जाईल. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप होईल. घरगुती कामे वाढतील. ज्येष्ठांची काळजी घ्यावी. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.
  • सिंह:-
    तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. कामात विशेष प्राविण्य मिळवाल. कामाची योग्य पावती मिळेल. वाहन जपून चालवावे. मानसिक तोल सांभाळावा.
  • कन्या:-
    मनात येईल तसा खर्च कराल. वादविवादात पडू नये. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. लहरीपणाने वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  • तूळ:-
    दिवसभर कामाची गडबड असेल. कर्तुत्वाला वेग येईल. स्वबळावर काम करण्याकडे कल राहील. थोडा हट्टीपणा कमी करावा. सर्व गोष्टींचा समतोल राखणे शक्य होईल.
  • वृश्चिक:-
    सामुदायिक वादात लक्ष घालू नका. क्षुल्लक अडचणींवर मात करावी. दिवसभर धावपळ करावी लागेल. काही कामे विनासायास अडकून पडतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे.
  • धनु:-
    प्रॉपर्टीच्या कामातून आर्थिक लाभ संभवतो. झोपेची तक्रार जाणवेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. मौल्यवान वस्तू संभाळाव्यात. शांतपणे विचार करावा.
  • मकर:-
    काही बदल अचानक दिसून येतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल. यात्रेचे योग येतील. गप्पीष्ट लोकांच्या समुहात वावराल. लहानात लहान होऊन खेळाल.
  • कुंभ:-
    वरिष्ठांना नाराज करु नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कामाचे सखोल ज्ञान घ्यावे. उपासनेकडे अधिक लक्ष द्यावे. वाहन चालवतांना सतर्क राहावे.
  • मीन:-
    कामात घरातील स्त्रियांचा हातभार लागेल. मनातील इच्छेला मूर्त रुप द्यावे. नवीन मित्र जोडाल. उष्णतेचे विकार जाणवतील. पत्नीचा हट्ट पुरवाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर