मेष

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. शनी मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. मारुतीला पाच दिवे लावावे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. मारुतीची उपासना करणे.
आजचा रंग – पांढरा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. शनी मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – नारंगी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. शनी मारुती मंदिरामध्ये दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे.
आजचा रंग – मरुन

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – पोपटी

धनु

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भावंडाशी वाद विवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

मकर

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. आज शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली अर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे.
आजचा रंग- राखाडी

मीन

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करणे.

आजचा रंग- तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu