• मेष:-
    तुमचा सल्ला घेतला जाईल. मनातील इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल. तुमचा चाहतावर्ग वाढेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक प्रश्न सुटेल.
  • वृषभ:-
    कार्यक्षेत्र विस्तारण्यावर लक्ष द्यावे. कामासाठी लहान प्रवास करावा लागेल. स्वत:च्या मताचा हक्क गाजवाल. कामाची लगबग राहील. शेजार धर्म पाळाल.
  • मिथुन:-
    योग्य मार्गदर्शन मिळेल. गुरुकृपेचा लाभ घ्याल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मदतीला धावून जाल. सामाजिक जाणीव ठेवाल.
  • कर्क:-
    छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. निष्ठा ढळू देवू नका. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कौटुंबिक शांतता राखावी.
  • सिंह:-
    प्रेमसौख्याला रंग चढेल. व्यापारी संस्थांवर लक्ष ठेवा. मुलांना प्रवासात सहाय्य कराल. कामाला अधिक गती येईल. खर्च वाढू शकतो.
  • कन्या:-
    संघटन कार्यात यश येईल. स्पर्धेत यश मिळवाल. कामगार वर्ग खुश असेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
  • तुळ:-
    लहान प्रवास चांगला होईल. कामात आईची साथ लाभेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आवडते छंद जोपासाल. महत्त्वाची कामे पुढे सरकतील.
  • वृश्चिक:-
    धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरात मंगलकार्य निघेल. कौटुंबिक वातावरणात रमाल.
  • धनु:-
    वादन कलेला चांगला वाव मिळेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. माहितीचा योग्य वापर करावा. भावंडांची मदत घ्याल. प्रवास मजेत होईल.
  • मकर:-
    बँकेचे काम कराल. गुंतवणुकीच्या कामात लक्ष घालाल. शेअरमधील गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार कराल. कौटुंबिक सौख्यात रमाल. आवडीच्या गोष्टींवर भर द्याल.
  • कुंभ:-
    इतरांवर तुमचे प्रभुत्व राहील. पत्नीशी वाद वाढवू नयेत. अपचनाचा त्रास जाणवेल. भागादारीतील बदल सकारात्मक विचारातून करावेत. किरकोळ वाद टाळावेत.
  • मीन:-
    ध्यानधारणा करण्यावर भर द्यावा. सामाजिक बांधिलकी जपाल. कामाच्या बाबतीत संतुष्ट असाल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. मानसिक शांतता जपावी.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर