05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ३० ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  अचानक अनपेक्षित लाभ होतील. वैवाहिक संबंध दृढ करावेत. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक व्यग्रता जाणवेल. पोटाची काळजी घ्यावी.
 • वृषभ:-
  जोडीदाराचे प्रेम वाढीस लागेल. वैवाहिक सौख्याला बहर येईल. भागीदारीतून चांगला फायदा होईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. दिवस मनाजोगा घालवता येईल.
 • मिथुन:-
  उगाच चिडचिड करू नये. क्षुल्लक गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. मानसिक तोल ढळू देवू नका. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. गैरसमज दूर करावेत.
 • कर्क:-
  जुगारातून यश संभवते. नवीन मित्र जोडाल. दिवसभर खेळीमेळीचे वातावरण असेल. करमणुकीत वेळ घालवाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
 • सिंह:-
  घरात टापटीप ठेवाल. बागकामात हातभार लावाल. सौदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. तुमचा दरारा वाढेल.
 • कन्या:-
  जवळचा प्रवास मजेत होईल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. गायक मंडळींना प्रशस्तीपत्र मिळेल. कौटुंबिक खर्च वाढेल. जवळचे सखे-सोबती भेटतील.
 • तूळ:-
  कामामुळे थकवा जाणवेल. उत्कृष्ट व्यावसायिक लाभ संभवतात. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडीचे पदार्थ चाखाल. आवडीबाबत आग्रही राहाल.
 • वृश्चिक:-
  प्रेमसौख्यात न्हाहून निघाल. अंगीभूत कलेला उठाव मिळेल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. मनाजोगी चैन कराल. मानसिक स्थैर्य लाभेल.
 • धनु:-
  काही गोष्टी तात्पुरत्या असतील. फसवणुकीपासून सावध राहावे. झोपेची तक्रार मिटेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. अपयशाने खचून जावू नका.
 • मकर:-
  मानसिक शांतता लाभेल. आवडत्या वस्तू खरेदी कराल. जवळच्या मित्रमंडळीत दिवस व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल.
 • कुंभ:-
  कामात किरकोळ अडचणी येवू शकतात. इतर गोष्टीत फार लक्ष घालू नका. कमिशनमध्ये चांगला फायदा संभवतो. तुमच्या वक्तृत्वाची चांगली छाप पडेल. व्यावसायिक वृद्धी संभवते.
 • मीन:-
  गृरुकृपेचा लाभ घ्यावा. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. कामातील चिकाटी सोडू नका. योग्य संगतीत वावराल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 30 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २७ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X