scorecardresearch

१४१ दिवस शनी सुरू करेल उलटी चाल; ‘या’ ४ राशींच्या लोकांना होऊ शकतो आर्थिक

४ राशीच्या लोकांसाठी हा १४१ दिवसांचा काळ विशेष फलदायी ठरेल. या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल.

shani 2
प्रातिनिधिक फोटो

Shani Vakri 2022 Date: ज्योतिष शास्त्रानुसार शनीची प्रतिगामी स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शनीच्या या चालीचा सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. प्रतिगामी शनि काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ फल देतो. ५ जून रोजी शनि कुंभ राशीमध्ये उलटी चाल सुरू करेल आणि २३ ऑक्टोबरपर्यंत या स्थितीत राहील. ४ राशीच्या लोकांसाठी हा १४१ दिवसांचा काळ विशेष फलदायी ठरेल. या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल.

मेष (Aries)

शनीची ही चाल मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. प्रवास सुखकर होईल आणि त्यातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या मुली पती आणि सासरच्या लोकांसाठी मानल्या जातात भाग्यवान!)

वृषभ (Taurus)

हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करून चांगले पैसे कमवू शकाल. गुंतवणुकीसाठी वेळ पुरेसा आहे. कुठेतरी अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात.

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींच्या लोकांचा विश्वास संपादन करणे असते कठीण!)

सिंह (Leo)

हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. घर किंवा वाहन मिळू शकते. संपत्तीत वाढ होईल. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी ती नोकरी मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते.

(हे ही वाचा: ‘ही’ जन्मतारीख असणाऱ्या लोकांमध्ये पैसा कमावण्याची असते प्रचंड हौस, शुक्राच्या कृपेने होतात सर्व काम!)

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. कर्जातून मुक्ती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत विजय मिळेल. एकंदरीत, हा कालावधी तुम्हाला भरपूर लाभ देण्यासाठी काम करेल.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 141 days saturn will start the reverse move people of these 4 zodiac signs can get financial benefits ttg

ताज्या बातम्या