Venus Number Effect,Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्या जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आपण पाहिले असेल की काही संख्या आपल्यासाठी लकी असते तर काही संख्या अशुभ असते. आजकाल माणूस आपला मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांक खूप विचारपूर्वक निवडतो. ते फक्त तेच आकडे निवडतात जे त्याच्यासाठी शुभ असतात. जेणेकरून त्याला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
१ ते ९ या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे. या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे राज्य आहे. आज आपण मुल्यांक ६ बद्दल बोलणार आहोत. मूलांक ६ चा शासक ग्रह शुक्र आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या लोकांना पैसे कमविण्याचा छंद असतो. चला जाणून घेऊया मूलांक ६ शी संबंधित लोकांच्या खास गोष्टी.
(हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांनावर असते धनाची देवता कुबेरांची विशेष कृपा)
पैसे कमविण्याची प्रचंड आवड
६ क्रमांकाचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो. जे प्रेम आणि शांतीचे प्रतीक आहे. मूलांक ६ असलेले लोक शरीराने मजबूत आणि दिसण्यात आकर्षक असतात. असे मानले जाते की या लोकांचे वृद्धत्व लवकर दिसत नाही. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. या लोकांना पैसे कमवण्याची जबरदस्त हौस असते. त्यासाठी ते कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही मेहनत घेतात. या लोकांना मनी माइंडेड असेही म्हणतात.
(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींसाठी शनि नक्षत्र संक्रमण ठरणार खास! संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता)
विलासी जीवन जगणे आवडते
या लोकांचे शिक्षण सहसा चांगले असते. ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसाही कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड आहे. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडते. या लोकांची कामे शुक्राच्या प्रभावाखाली होत असतात.
(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ३ राशीची मुलं ठरतात परफेक्ट पार्टनर !)
‘या’ क्षेत्रात मिळते यश
या जन्मतारीख असलेल्या लोकांनी मीडिया, फॅशन डिझायनिंग किंवा अभिनयाचा कोर्स केला तर त्यांना चांगले यश मिळू शकते. यासोबतच कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यवसाय त्यांना खूप प्रगती देतो. हलका निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग तुमच्यासाठी सर्वात शुभ मानला जातो.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)