14th May Panchang & Rashi Bhavishya: १४ मे २०२४ ला वैशाख शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. ही तिथी गंगासप्तमी म्हणून सुद्धा ओळखली जाते. या दिवशी मंगळवार आहे. बुधवारी पहाटे चार वाजून २० मिनिटांपर्यंत सप्तमी तिथी कायम राहणार आहे. १४ मेच्या संपूर्ण रात्रभर व सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत वृद्धी योग असणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजून ७ मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र कायम असेल. मंगळवारी सूर्यदेव वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. १४ मे २०२४ चा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे पाहूया..

१४ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

वृषभ:-चारचौघांत मिळून मिसळून वागाल. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा.

मिथुन:-गरज नसलेल्या वस्तु खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रवासाचा योग येईल.

कर्क:-चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. मनातील अपेक्षा पूर्ण होतील.

सिंह:-कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील सुसंगतता व स्थैर्य जपाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल.

कन्या:-धार्मिक ग्रंथ वाचाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका. दिरंगाईतून मार्ग काढावा लागेल.

तूळ:-हातातील वेळेचा सदुपयोग करा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका. नसते साहस अंगाशी येऊ शकते.

वृश्चिक:-कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.

धनू:-अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजी दूर होईल.

मकर:-मुलांचे वागणे बिनधास्त वाटू शकते. आपले कलागुण जतन करण्याचा प्रयत्न करावा. बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका.

कुंभ:-बर्‍याच गोष्टी सामोपचाराने हाताळाव्यात. वडीलधार्‍याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत.

हे ही वाचा<< चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी

मीन:-जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. वादाचे मुद्दे लांब ठेवावेत. सामुदायिक जाणीव जागृत ठेवावी. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर