19 April Panchang & Rashi Bhavishya Marathi: १९ एप्रिलला चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. गुढीपाडव्यापासून सुरु झालेल्या नववर्षातील ही पहिलीच एकादशी असणार आहे. यादिवशी रात्री ८ वाजून ५ मिनिटांपर्यंत एकादशी तिथी कायम असेल. तर आजचा संपूर्ण दिवस व १९ एप्रिलला मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांपर्यंत वृद्धी योग कायम असणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत मघा नक्षत्र जागृत असेल व त्यानंतर पूर्वफल्गुनी नक्षत्र जागृत होईल. आजचा दिवस कामदा एकादशी व्रत सुद्धा असणार आहे. आजचा दिवस राशिनुरूप तुमच्यासाठी कसा जाणार हे पाहूया..

कामदा एकादशी विशेष राशी भविष्य

मेष:-स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका. आपले मत उत्तम रित्या मांडाल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. कलेला पोषक वातावरण लाभू शकते.

Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Gauri pujan 2024 marathi Ukhane
Gauri Pujan Ukhane 2024 : गौरीच्या ओवशादिवशी घ्या ‘हे’ १० मराठमोळे उखाणे, ऐकताच सगळे होतील खुश
Till Anant Chaturdashi With Bappa's blessings
अनंत चतुर्दशीपर्यंत पैसाच पैसा; बाप्पाच्या आशीर्वादाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार मालामाल
Shukra Gochar 2024 malavya yog
१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा
7th September Rashi Bhavishya & Panchang
गणेश चतुर्थी, ७ सप्टेंबर पंचांग: बाप्पाच्या आगमनाने कोणत्या राशीला होणार सुवर्णलाभ? व्यापारी वर्गाची चांदी तर धनलाभाचे योग जुळणार; वाचा तुमचे भविष्य

वृषभ:-सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

मिथुन:-दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत.

कर्क:-तुमच्या स्वभावावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल.

सिंह:-उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. अधिक उर्जेने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कन्या:-मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सट्टा जुगारा पासून दूर राहावे. उपासनेला अधिक वेळ देता येईल. पारमार्थिक मदत कराल.

तूळ:-जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा. दिवसभर कार्यरत राहाल.

वृश्चिक:-कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. भावंडांची मतभेद संभवतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

धनू:-लहरीपणाने वागू नये. बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे. कष्टाला घाबरू नका.

मकर:-डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अधिकाराचा उत्तम वापर करता येईल. मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. आपलेच म्हणणे खरे कराल.

कुंभ:-दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील. मुलांच्या आनंदात रमून जाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.

हे ही वाचा<<हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती

मीन:-मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. एककल्ली विचार करू नका. बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर