Chandra Grahan 2023: वर्षातून अगदी मोजक्या वेळा घडणारी खगोलिय घटना म्हणजेच ग्रहणाला धार्मिक बाबींमध्ये सुद्धा विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात या काळात राहू व केतूचा पृथीवरील प्रभाव वाढू लागतो. वैज्ञानिक माहितीनुसार, जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्र ग्रहण होते. चंद्र ग्रहणाचे छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे तीन प्रकार आहेत. यावेळेसचे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील आहे. विशेष म्हणजे शरद/ कोजागिरी पौर्णिमेला यावेळेस ग्रहण लागणार आहे. यावेळेस चंद्रासह पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या गुरू ग्रहाची युती सुद्धा दिसणार आहे. गुरू ग्रह पुढील आठवड्यात पृथ्वी जवळ येत असल्याने आकाराने मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. तिथी व सुतक काळानुसार चंद्रग्रहण नेमकं २८ ऑक्टोबरला आहे की २९ ला याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

खंडग्रास चंद्रग्रहण तिथी (Lunar Eclipse Tithi)

पौर्णिमा तिथी प्रारंभ: २८ ऑक्टोबर सकाळी ४ वाजून १७ मिनिटे
पौर्णिमा तिथी समाप्ती: २९ ऑक्टोबर राईए १ वाजून ५३ मिनिटे

चंद्रग्रहण नेमकं २८ की २९ ऑक्टोबरला?

ज्योतिषांच्या माहितीनुसार भारतात चंद्र ग्रहण २९ ऑक्टोबरला रात्री उशिरा म्हणजेच पहाटे १.०६ मिनिटांनी सुरू होईल आणि २.२३ मिनिटांनी समाप्त होईल. वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण हे भारतात दिसणार असल्याने सुतक काळ सुद्धा पाळला जाणार आहे. चंद्र ग्रहणाच्या कालावधीत ९ तासांचा सुतक काळ असणार आहे. सुतक काळ संध्याकाळी ४ वाजून ६ मिनिटांनी सुरु होणार आहे.

हे ही वाचा<< २०२४ च्या मार्चपर्यंत शनी ‘या’ राशीच्या लोकांना करतील लखपती? कुंडलीत साडेसातीचा प्रभाव कसा बदलणार, वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खगोलशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार २.२२ मिनिटाने खंडग्रास ग्रहण संपणार असले तरी चष्म्याशिवाय न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण ३.५६ वाजता संपेल. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले होते. हे या वर्षांतील शेवटचे ग्रहण असेल.