scorecardresearch

जाणून घ्या : वास्तूनुसार घराच्या देव्हाऱ्यात काय ठेवावे आणि काय नाही

अनेकदा घरामध्ये देव्हारा बनवताना आपण काही चुका करतो. यामुळे घरामध्ये सुख-शांतीच्या जागी दारिद्र्य पसरू शकते.

वास्तुशास्त्रात देव्हाऱ्यासंबंधी भरपूर माहिती देण्यात आली आहे, जी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. (प्रातिनिधिक फोटो)

प्रत्येक घरात एक लहानस देव्हारा असतो, जो संपूर्ण घराला खास बनवतो आणि कुटुंबामध्ये आस्था जागृत करतो. सनातन धर्मात उपासनेच्या नियमांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि शांततेचे वातावरण तयार होते, असे मानले जाते. पूजेच्या या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पूजा पूर्ण होत नाही. ती अपूर्ण मनाली जाते.

काही लोक घरामध्ये लहानसा देव्हारा तयार करतात तर काही मोठा. मात्र, अनेकदा घरामध्ये देव्हारा बनवताना आपण काही चुका करतो. यामुळे घरामध्ये सुख-शांतीच्या जागी दारिद्र्य पसरू शकते. म्हणूनच घरामध्ये देव्हारा तयार करताना वास्तुशास्त्राची मदत घेणे उपयुक्त ठरते. वास्तुशास्त्रात देव्हाऱ्यासंबंधी भरपूर माहिती देण्यात आली आहे, जी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जाणून घेऊया, वास्तुनुसार घरातील देव्हाऱ्यामध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये.

जाणून घ्या रुद्राक्ष कधी आणि कोणी धारण करू नये

  • असे मानले जाते की देव्हाऱ्यामध्ये गौरी गणेश यांच्या तीन मुर्त्या ठेवू नयेत. असे म्हणतात, तीन मुर्त्या ठेवल्याने घरात अशांतीचे वातावरण तयार होते. असेही म्हटले जाते की घरामध्ये गणपतीच्या एक किंवा दोनच मुर्त्या ठेवाव्यात.
  • घरातील देव्हाऱ्यात शंख ठेवणे चांगले मानले जाते. मात्र, फक्त एकच शंख ठेवणे शुभ मानले जाते. लक्षात ठेवा, देव्हाऱ्यात कधीही एकपेक्षा जास्त शंख ठेवू नये. असे म्हटले जाते की देव्हाऱ्यामध्ये एकापेक्षा अधिक शंख असल्यास दुसरा शंख एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जित करावे किंवा एखाद्या मंदिरामध्ये द्यावे.
  • अनेकदा लोक आपल्या लाडक्या देवतेची मूर्ती घरच्या मंदिरात स्थापन करून नियमानुसार देवाची पूजा करतात. घरातील देव्हाऱ्यात मूर्तीची पूजा केली जात नाही हे लक्षात ठेवा. म्हणूनच घराच्या देव्हाऱ्यात कधीही मोठी मूर्ती ठेवू नये.
  • अनेक लोक महादेवाचे परम भक्त असतात. घरातील देव्हाऱ्यात शिवलिंगाची पूजा करून हे लोक महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. पण घरातील देव्हाऱ्यात ठेवलेले शिवलिंग कधीही अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे हे लक्षात ठेवा.
  • असे म्हटले जाते की घरातील देव्हाऱ्यात कधीही तुटलेल्या मुर्त्या ठेवू नयेत किंवा त्यांची पूजा करू नये. म्हटले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, ज्यामुळे घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते.
  • असे मानले जाते की आरतीच्या वेळी संपूर्ण आरती संपेपर्यंत पुरेल इतके तेल दिव्यामध्ये असावे. अनेकदा दिव्यामध्ये पुरेसे तेल नसल्याने आरती सुरु असतानाच दिवा विझतो, हे अशुभ मानले जाते. असे झाल्यास पूजा अपूर्ण मनाली जाते.
  • पूजेच्या वेळी देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करा. याशिवाय जमिनीवर पडलेली फुले कधीही देवाला अर्पण करू नयेत.
  • असे मानले जाते की तुळशीची पाने ११ दिवस शिळी होत नाहीत, म्हणून तुळशीच्या पानांवर पाणी शिंपडून ते देवाला अर्पण केले जाऊ शकतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: According to vastu shastra know what to keep and what not in temple of the house pvp

ताज्या बातम्या