ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनिदेव जेव्हा जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात, तेव्हा काही राशींना साडेसाती आणि अडीचकी सुरू होते. तर काही राशींना त्यातून मुक्ती मिळते. असे मानले जाते की शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे ग्रहांमध्ये शनिला न्यायाधीशाचे स्थान आहे. २९ एप्रिल रोजी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होईल. चला जाणून घेऊया शनिच्या या संक्रमणाने कोणत्या राशीच्या लोकांना साडेसाती सुरू होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिष पंचांगानुसार २९ एप्रिलपर्यंत धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचा प्रकोप होईल. यानंतर २९ एप्रिल रोजी शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच मीन राशीच्या लोकांना शनि साडेसाती सुरू होईल, तर धनु राशीच्या लोकांची सुटका होईल. दुसरीकडे, मकर राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, मकर राशीच्या लोकांवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा वेदनादायक मानला जातो. तर दुसरा टप्पा कुंभ राशीच्या लोकांवर सुरू होईल. त्यामुळे या लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. काही कामांमध्ये अडचण येऊ शकते. या काळात व्यवसायात कमी फायदा होऊ शकतो. तसेच गंभीर आजार होऊ शकतात. मात्र, शनि जेव्हा स्वराशी किंवा मित्र राशीत प्रवेश करतो तेव्हा काहीसा दिलासा मिळू शकतो.

शनि वक्री होणार
१२ जुलैपासून शनि ग्रह पुन्हा एकदा त्याच्या पूर्वीच्या आवडत्या राशीत मकर राशीत पूर्वगामी अवस्थेत प्रवेश करेल. मकर राशीत शनि संक्रमण होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर पुन्हा शनि अडीचकी सुरु होईल आणि त्यांना १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनि दशेला सामोरे जावे लागेल. तसेच शनिदेव वक्री अवस्थेत तेजस्वी फळ देतात.

१२ वर्षांनंतर मीन राशीत येणार देव गुरु बृहस्पति, या तीन राशींना येणार ‘अच्छे दिन’

शनिदोषापासून मुक्तीसाठी हे उपाय करा

  • साडेसाती आणि अडीचकी सुरु होते तेव्हा शनिवारी उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ आणि काळे हरभरे यासारख्या काळ्या वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला दान कराव्यात. असे केल्याने शनिदेवाची कृपा कायम राहते.
  • शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते.
  • ‘ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः’ आणि ‘ओम शं शनिश्चरायै नमः’ या मंत्राचा जप करा
  • शनिदेवाची साडेसाती किंवा अडीचकी सुरु आहे, अशा लोकांनी शनिवारी हनुमानाची पूजा करावी. हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचा पाठ करावा. यामुळे शनिदेवाचे नकारात्मक परिणाम कमी होतात.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 22 years sadesati start to meen rashi rmt
First published on: 09-04-2022 at 15:03 IST