scorecardresearch

Premium

दिवाळी संपताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? मालव्य राजयोग बनल्यामुळे अचानक धनलाभाची शक्यता

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये मालव्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो.

After Diwali Malavya Rajyog
दिवाळी संपताच 'या' राशींचे अच्छे दिन सुरु? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये मालव्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो. ती व्यक्ती राजासारखं आयुष्य जगते आणि त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नसते असं मानलं जातं. अशातच आता दिवाळीनंतर मालव्य राजयोग तयार होणार आहे. हा योग ३० नोव्हेंबरला शुक्र ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केल्यामुळे तयार होणार आहे. त्यामुळे काही राशींचे नशिब उजळण्याची शक्यता आहे. तसेच, या राशींच्या संपत्तीत भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

मकर रास

Rahu Gochar 2024
Rahu Gochar 2024 : राहू गोचरमुळे या राशी होतील मालामाल, मिळणार गडगंज पैसा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Nobel laureate economist Michael Spence asserts that artificial intelligence will bring major changes in the future
कृत्रिम प्रज्ञेमुळे भविष्यात मोठी स्थित्यंतरे; नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ मायकेल स्पेन्स यांचे प्रतिपादन
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: देशात बाजारविषयक शहाणीवेचा अभाव
Shani Dev
‘केंद्र त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींवर वर्षभर राहणार शनिदेवाची कृपा? मिळू शकते प्रचंड श्रीमंत होण्याची संधी

मालव्य राजयोग तुमच्या राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या कर्म स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित गोष्टींमध्ये चांगले यश मिळू शकते. बेरोजगारांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. शुक्र हा तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानाचा स्वामी असल्यामुळे तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे.

तूळ रास

मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीत तयार होणार आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारु शकते, तसेच या काळात तुमची कार्यशैली चांगली राहू शकते. व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला करिअरशी संबंधित काही सुवर्ण संधी मिळू शकतात. तसेच रखडलेली पुन्हा सुरू होऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तुमच्या जोडीदाराकडून तम्हाला सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. शुक्र तुमच्या राशीच्या आठव्या स्थानाचा स्वामी असल्यामुळे संशोधनाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

हेही वाचा- ऐन दिवाळीपूर्वी सूर्यदेवाचे नक्षत्र परिवर्तन; पुढील १० दिवस ‘या’ राशींवर लक्ष्मी धनवर्षाव करण्याची शक्यता

कन्या रास

दिवाळीनंतर तयार होणारा मालव्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या स्थानी हा योग तयार होणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरु शकते. तर व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात. शुक्र ग्रह हा तुमच्या राशीच्या नवव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे तुम्ही भाग्यवान ठरु शकता. स्पर्धात्मक विद्यार्थी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After diwali malavya rajyog is going to be created by venus the giver of wealth people of these zodiac signs will get immense money jap

First published on: 08-11-2023 at 15:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×