Surya And Shukra Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी संयोग करतो. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ७ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे , जिथे सूर्य देव आधीच बसला आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रह राजेशाही शक्ती, राज्यसेवा, राजकारण यांचा कारक मानला गेला आहे. तर शुक्रदेव वैभव, संपत्ती, भौतिक सुख आणि ऐशोआराम यांचा कारक मानला जातो. त्यामुळे या दोन ग्रहांच्या संयोगामुळे या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडेल, परंतु त्याच वेळी काही तीन राशी आहेत, ज्यांना या काळात करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

तूळ राशी

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य देवाच्या युतीमुळे तूळ लोकांच्या राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण या ग्रहांचा संयोग तुमच्या संक्रमण कुंडलीतून दहाव्या घरात तयार होत आहे. जे व्यवसाय आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू देखील मिळू शकते. त्याचबरोबर या काळात तुमच्या कामात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते. तसेच तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे सूर्य आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

( हे ही वाचा: Shukra Rashi Parivartan: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ कर्क, कन्या आणि मीन राशींसाठी असेल चांगला काळ; नोकरी आणि व्यवसायात होईल भरभराट)

मिथुन राशी

सूर्य आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण हा संयोग तुमच्या राशीशी दुसऱ्या घरात तयार होत आहे. जे धन आणि वाणीचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायात देखील चांगला नफा होण्याची शक्यता आहे. तर ज्या लोकांची कारकीर्द भाषण क्षेत्राशी संबंधित आहे. जसे की, फिल्म लाइन, मीडिया, शिक्षक किंवा मार्केटिंग त्यांच्यासाठी हा काळ अधिक चांगला असणार आहे. यावेळी तुम्ही ओपल किंवा पन्ना रत्न घालू शकता. जे तुमच्यासाठी भाग्यवान रत्न सिद्ध होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्या राशी

शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे कन्या राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या राशीतून ११व्या घरात शुक्र आणि सूर्य देवाचा संयोग तयार झाला आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानण्यात येते. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही अनेक माध्यमांतून पैसे कमवू शकाल. त्याच वेळी, व्यवसायात देखील प्रचंड नफा होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळू शकतात. यावेळी तुम्ही परदेशातून व्यवसाय करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.