वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचे हे संक्रमण काही राशींच्या लोकांचा आत्मविश्वास आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढवेल. त्यांचा चांगला बौद्धिक विकास करेल. बुध ग्रह शुभ ग्रहांच्या संगतीत असल्यास फायदेशीर परिणाम देतो. ज्योतिषांच्या मते बुध ग्रह ज्ञान आणि बुद्धीचे प्रतिनिधित्व करतो. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा अधिपती ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात बुध असेल तर त्या व्यक्तीसाठी अशुभ परिणाम मिळण्याची शक्यता असते. ज्योतिषीय गणनेनुसार, बुध ग्रह मकर राशीत ६८ दिवस भ्रमण आहे. यामध्ये १५ जानेवारीला बुध ग्रह मकर राशीत वक्री झाला होता. आता पुन्हा ४ फेब्रुवारीला मार्गस्थ होईल. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी बुध मकर राशीत असेल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर काय परिणाम होईल?
मेष: या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसेल. या काळात प्रोत्साहन, प्रशंसा आणि पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. सोबतच नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. दररोज ४१ वेळा”ओम नमो नारायण” या मंत्राचा जप करा. बुधवारी उपवास देखील करावा.
वृषभ: बुध ग्रहाचं मार्गक्रमण या राशीच्या लोकांची अडकलेली कामं मार्गी लावेल. लोकांना नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. तसेच परदेशातून काही व्यावसायिक संपर्क मिळवता येतात. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. या काळात तुम्ही अधिक उत्साही होऊन या वेळेचा आनंद घ्याल. दिवसातून ३२ वेळा “ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः” या मंत्राचा जप करा.
Astrology 2022: १३ फेब्रुवारीला शनिच्या राशीत सूर्य ग्रहाचा गोचर; चार राशींना धनलाभाचा योग
धनु: बुधाचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी फारसे चांगले नाही, या काळात त्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागू शकते. याशिवाय करिअरचा विचार करताना योग्य नियोजन करावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने डोळ्यांची विशेष काळजी घ्या. रोज सकाळी १०८ वेळा “ओम नमो नारायण” चा जप करावा.
मकर: मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. कारण या राशीत बुध वक्री होता आणि आता तो मार्गस्थ होणार आहे. या दरम्यान, तुम्हाला करिअरच्या बाबतीत सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि आरोग्य चांगले राहील. या दरम्यान नारायणीमचा पाठ करावा.