Astrology 2022: धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती; या तीन राशींसाठी चांगला योग

धन आणि वैभव देणारा शुक्र आणि शौर्य देणारा मंगळ ग्रहाचा धनु राशीत संयोग होत आहे.

merucy-planet-change-2
Astrology 2022: धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती; या तीन राशींसाठी चांगला योग

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रहांची राशी बदलते किंवा ग्रहांचा संयोग होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. धन आणि वैभव देणारा शुक्र आणि शौर्य देणारा मंगळ ग्रहाचा धनु राशीत संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुख, वैवाहिक सुख, उपभोग-विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय आणि फॅशन-डिझाइनिंग इत्यादींचा कारक मानला जातो. दुसरीकडे, मंगळ हा ऊर्जा, भाऊ, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्याचा कारक मानला गेला आहे. मंगळ आणि शुग्र ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. मात्र तीन राशींवर विशेष कृपा असेल. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.

वृश्चिक: मंगळ आणि शुक्राचा संयोग वृश्चिक राशीच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या अर्थात धनभावात आहे. हा संयोग वृश्चिक राशीच्या लोकांच्या धन आणि संपत्तीत वृद्धी करणारा आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. पैसे अडकले असतील तर ते या काळात येऊ शकतात. वृश्चिक राशी ही मंगळाची रास आहे. त्यामुळे हा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

कुंभ: कुंभ राशीच्या कुंडलीतील अकराव्या अर्थात उत्पन्न भावात शुक्र-मंगळाचा संयोग होत आहे. या संयोगाचा या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. वैद्यकीय क्षेत्र, सैन्य, पोलीस, मीडिया, कला इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना याचा फायदा होईल. अनेक स्त्रोतांकडून पैसे कमवण्याची संधी मिळेल. तसेच यावेळी तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते.

Astrology 2022: सूर्याच्या गोचरामुळे १३ फेब्रुवारीपासून तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

मिथुन: या राशीच्या लोकांच्या संक्रमण कुंडलीच्या सातव्या भावात म्हणजेच वैवाहिक भावात मंगळ आणि शुक्राचा संयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांचे जोडीदारासोबत चांगले संबंध दिसून येतील. भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. जर तुम्ही एखाद्यासोबत भागीदारीचे काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या काळात सुरुवात करू शकता. प्रेमासाठी हा काळ अनुकूल राहील. यासोबतच कौटुंबिक दृष्टिकोनातून सुख-समृद्धी राहील. बुद्धिमत्तेच्या जोरावर पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Astrology 2022 shukra mangala grah yuti in dhanu rashi rmt

Next Story
Vastu Tips : किचनमध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; अन्यथा मोठ्या आर्थिक संकटाचा करावा लागेल सामना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी