Trigrahi Yog in Meen Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह एक महिन्याने आपली स्थिती बदलतो. बुधदेव आज ९ एप्रिल २०२४ रोजी रात्री साडेनऊ वाजता मीन राशीत गोचर करणार आहेत. या राशीमध्ये शुक्र आणि सूर्य देव आधीच उपस्थित आहेत. बुधाच्या संक्रमणामुळे या राशीत त्रिग्रही योग तयार होईल. या योगामुळे तीन राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना व्यवसाय मोठा फायदा होऊ शकतो, चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ?

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाऊ शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील आणि तुम्हाला वेतनवाढ, मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते. व्यावसायिकांसाठीही काळ चांगला जाऊ शकतो. तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. या राशीचे लोक करिअरमध्ये मोठी झेप घेऊ शकतात. धार्मिक कार्यातही तुमची रुची वाढण्याची शक्यता आहे.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Surya And Guru Conjunction Marathi News
वाईट काळ संपेल! १३ एप्रिलपासून ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? २ ग्रहांची युती होताच मिळू शकतो चांगला पैसा
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती

(हे ही वाचा : तीन शुभ राजयोगांचा गुढीपाडवा! हिंदू नववर्षात ‘या’ राशींच्या नशिबाला मिळू शकते कलाटणी; ३६५ दिवस मिळू शकतो बक्कळ पैसा )

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाच्या निर्मितीमुळे चांगली बातमी मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो, तुम्हाला तुमच्या आवडीच्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना पैसे मिळण्याची जोरदार शक्यता आहे. भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकतो.

मकर राशी

मीन राशीत तयार झालेला त्रिग्रही योग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकतो. कामात येणारे अडथळे दूर होऊन तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही सुवर्ण संधी मिळू शकतात. या काळात पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)