वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ६ मार्च रोजी बुध ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा व्यक्तीच्या जीवनात संवाद, तर्कशास्त्र, गणित, हुशारी आणि बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो. यासोबतच बुध हा दळणवळण आणि व्यापाराचा कारक देखील आहे. त्यामुळे बुधाचे संक्रमण सर्व राशींच्या आर्थिक विकासावरही परिणाम करतो. चला जाणून घेऊया कोणत्या चार राशी आहेत, ज्यांना विशेष फायदे होऊ शकतात.

मेष: तुमच्या राशीत बुध ग्रह अकराव्या स्थानात म्हणजेच उत्पन्नाच्या स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील. अनावश्यक खर्चाला आळा बसेल. दुसरीकडे, बुध हा तुमच्या तिसऱ्या घराचा स्वामी आहे. तिसरं स्थान म्हणजे भाऊ आणि बहीण, पराक्रम आणि धैर्याचे घर. त्यानंतर सहावे घर म्हणजे रोग, विवाद, कर्ज आणि सेवा यांचं स्थान. त्यामुळे या काळात भाऊ-बहिणीची साथ मिळेल. तसेच रोगापासून मुक्ती मिळू शकते. या दरम्यान तुमची शक्ती देखील वाढेल.

वृषभ: बुध तुमच्या राशीत दहाव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला कर्म आणि करिअरचे घर म्हटले जाते. तसे बुध तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते आणि तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. प्रॉपर्टी डील आणि रिअल इस्टेटच्या व्यवसायात गुंतलेल्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो.

Astrology: मार्च महिन्यात चार ग्रह बदलणार राशी, तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या

मिथुन: तुमच्या राशीत बुध ग्रह नवव्या भावात भ्रमण करेल. या स्थानाला भाग्याचे घर आणि परदेश प्रवासासंदर्भात माहिती मिळते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. दुसरीकडे, जे शेअर बाजाराशी संबंधित आहेत, ते चांगले पैसे कमवू शकतात. व्यवसायात नवीन डील फायनल होऊ शकते. या काळात तुम्ही व्यवसायाशी संबंधित प्रवास देखील करू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर: तुमच्या राशीतून बुध ग्रह दुसऱ्या भावात भ्रमण करेल. या स्थानाला धन आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. दुसरीकडे, बुध तुमच्या सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. सहावं स्थान म्हणजे सेवा आणि शत्रूचे घर आणि नववे घर म्हणजे समृद्धी आणि भाग्याचे घर. त्यामुळे यावेळी तुम्हाला गुप्त शत्रूंपासून मुक्ती मिळेल.