Bhadra Rajyog: वैदिक पंचांगानुसार बुध ग्रह एक वर्षानंतर स्वतःच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. भद्र राजयोग ज्यांच्या कुंडलीत तयार होत असतो, त्यांना जीवनातील सर्व भौतिक सुख प्राप्त होतात. तसेच त्या राशीतील व्यक्तीला व्यवसायात चांगले पैसे मिळण्याची शक्यता असते, तसेच त्याची संभाषणाची शैलीही चांगली होते. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा राजयोग तयार होणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना धनलाभ आणि करिअर-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कन्या रास (Kanya Zodiac)
बुधाचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण तुमच्या कुंडलीच्या लग्न स्थानी भद्र राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. याबरोबर तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आकर्षण वाढू शकते. जीवनसाथीची प्रगती होऊ शकते. विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भागीदारीच्या कामातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
मकर रास (Makar Zodiac)
भद्र राजयोग तयार झाल्याने मकर राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून भाग्य स्थानात भ्रमण करणार आहे. तसेच, बुध ग्रह हा तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमचे नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. तसेच कोर्ट केसेसमध्येही यश मिळू शकते. त्याचबरोबर धार्मिक कार्यात पैसा खर्च करू शकता. त्याचबरोबर तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
धनु रास (Dhanu Zodiac)
भद्र राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण हा राजयोग तुमच्या राशीनुसार कर्माच्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. यासोबतच नोकरदारांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकतात. दुसरीकडे, व्यावसायिकांना यावेळी चांगल्या ऑर्डर मिळू शकतात. त्यामुळे चांगला नफा होऊ शकतो, तसेत तुम्ही नवीन कामाला सुरूवात करू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)